कर्मचाऱ्याने रुमालात दगडं बांधून आणले अन् दवाखान्यात डाॅक्टरवर केला हल्ला, पण का?

हरी तुगावकर
Wednesday, 19 August 2020

मुलाच्या शिक्षणासाठी पन्नास हजार रुपयाच्या मागणीवरून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानेच डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना लातूर शहरात घडली. गायत्री रुग्णालयाचे डॉ. रमेश भराटे यांच्यावर कर्मचाऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.https://www.esakal.com/marathwada/latur-district-historical-inscriptions-reading-two-parts-335542

लातूर: मुलाच्या शिक्षणासाठी पन्नास हजार रुपयाच्या मागणीवरून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानेच डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना लातूर शहरात घडली. गायत्री रुग्णालयाचे डॉ. रमेश भराटे यांच्यावर कर्मचाऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हल्ला केलेला कर्मचारी दोन महिन्यापासून रुग्णालयात काम करत होता. गायत्री रुग्णालयात नेहमीप्रमाणे बुधवारी डॉ. भराटे हे राऊंड घेऊन ओपीडीमध्ये बसले होते. दरम्यान त्यांच्याकडे लक्ष्मण मव्हाळे व सोबत एक असे दोघे त्यांच्याकडे आले. या रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु झाल्यापासून मव्हाळे हा कामावर नाही. पण अचानक तो आज रुग्णालयात आला. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ५० हजार द्या असे म्हणत त्याने पैशांची मागणी केली.

हेही वाचाः उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्राचा आधारवड हरपला, भगवानसिंह बयास यांचे निधन

एवढी मोठी रक्कम देवू शकत नाही म्हटल्यानंतर त्याने डॉ. भराटे यांना अर्वाच्‍य भाषेत शिवीगाळ केली. मला पैसे का देत नाही म्हणून रुमालात दगड बांधून मव्हाळे याने डॉ. भराटे यांच्यावर हल्ला केला. यात डॉ. भराटे जखमी झाले. पैसे नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. यात डॉ. भराटे जखमी झाले असून त्यांच्यावर येथे उपचार सुरु असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मदत मागण्याचा हा प्रकार असतो का? हा सरळ खंडणीखोरपणा आहे अशी भावना डॉक्टर भराटे यांनी व्यक्त केली. आपणांस अगदी वेळेत डॅा. महळंगीकर, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. अजय पुनपाळे, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. विशाल गरड, डॉ. चिपडे, डॉ. तापडीया, डॉ. अतुल देशमुख, डॉ. लकडे पाटील, डॉ. गव्हाणे यांनी मदत केल्याचे डॉ. भराटे यांनी सांगितले.

हे वाचलंत का?: नऊशे वर्षांपुर्वी असे होते लातूर ! वाचा सविस्तर

संपादन: गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Staff Member Attacked On Doctor Latur News