Latur News : उदगीरला आठपासून रंगणार कुस्तीचा फड ; येणार राज्यभरातील कुस्तीपटू

खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी येथील तालुका क्रीडा संकुलात आठ ते १२ मार्चदरम्यान राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. राज्यातील कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होतील, अशी माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी (ता. ३) येथे पत्रकार परिषदेत दिली.
Latur News
Latur Newssakal

उदगीर : खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी येथील तालुका क्रीडा संकुलात आठ ते १२ मार्चदरम्यान राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. राज्यातील कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होतील, अशी माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी (ता. ३) येथे पत्रकार परिषदेत दिली. बनसोडे म्हणाले, राज्याच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना, वाढ होण्यासाठी विविध खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला खेळाकडे आकर्षित करून त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देणे आवश्यक आहे. त्यानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत.

कुस्ती महाराष्ट्रात सर्वत्र खेळली जाते. देशातील इतर राज्यांत व देशाबाहेर कुस्तीचा प्रचार व प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. आता येथे राज्यस्तरीय स्पर्धा घेतली जात आहे. उदगीर शहरात यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा महोत्सव, राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा यांसारखे मोठे उपक्रम झाले आहेत. याच धर्तीवर आठ ते १२ मार्चदरम्यान खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे.

Latur News
Sambhaji Nagar News : अडीच हजार शेतकऱ्यांना मिळतेय दिवसा वीज!

राज्यभरातील कुस्तीपटू येणार

येथील कुस्ती स्पर्धेत राज्यातील एकूण ३६० कुस्तीपटू, संघ व्यवस्थापक सहभागी होतील. यात फ्री स्टाइल, ग्रिको रोमन पद्धतीच्या कुस्तीचे प्रत्येकी दहा, मुलींचे १० असे ३० संघ सहभागी होतील. खेळाडूंच्या पालकांसाठीही राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना प्रथम ६० हजार, द्वितीय ५० हजार, तृतीय ३० हजार रुपये याप्रमाणे प्रत्येक गटास बक्षीस देण्यात येणार आहे. दरम्यान, अर्जुन पुरस्कार विजेते, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांसह राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेल्यांचा सन्मान या स्पर्धेत केला जाणार आहे.

तहसीलदार राम बोरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सूर्यकांत लकडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अस्लम काझी, तालुका क्रीडाधिकारी चंद्रकांत लोदगेकर, पोलिस निरीक्षक करण सोनकवडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्‍घाटन होणार भव्य-दिव्य

तालुका क्रीडा संकुल मैदानावर नऊ मार्चला सायंकाळी सहाला स्पर्धेचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी लेझर शो, फटाक्यांची आतषबाजी यांसह अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून हा सोहळा भव्य-दिव्य करण्याचे नियोजन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com