esakal | मंत्री नंतर, आधी मी शेतकऱ्याचा मुलगा, नुकसानीची दाहकता मुख्यमंत्र्यांकडे मांडतो
sakal

बोलून बातमी शोधा

ausa bansode.jpg

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, मी मंत्री नंतर झालो. आधी मी शेतकर्याचाच मुलगा आहे. लातूर जिल्ह्यातील नुकसानीचे माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र, मुख्य सचिवांसमोर मांडतोच. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. मदत नक्कीच मिळेल. औसा तालुक्यात पाहणी केल्य़ानंतर प्रशासकीय स्तरावर बैठक घेतली. 

मंत्री नंतर, आधी मी शेतकऱ्याचा मुलगा, नुकसानीची दाहकता मुख्यमंत्र्यांकडे मांडतो

sakal_logo
By
जलील पठाण

औसा (लातूर) : शेतीत नुकसान झाल्यावर शेतकऱ्याला काय वेदना होतात. त्याला आयुष्यात कशा संकटांना सामना करावा लागतो. हे मी चांगले जाणतो. कारण मी जरी मंत्री असलो. तरी मी प्रथम शेतकऱ्याचा मुलगा आहे. दोनदा झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांसोबतच सुपिक जमीन वाहुन गेली आहे. रस्ते, रोहीत्र याचंही मोठ नुकसान झालं आहे. झालेल्या नुकासाणीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसोबत खंबीर उभे असल्याने शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. दोन दिवस जिल्ह्यातील नुकसाणीची पाहणी करुन सत्य परिस्थिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिवांना सांगणार असल्याची माहीती राज्यमंत्री संजय बसनोडे यांनी दिली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

औसा -निलंगा तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसाणीची पाहणी केल्यावर औशाच्या प्रशासकीय कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. सोबत माजी पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पवार, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, तहसीलदार शोभा पुजारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी प्रथम तालुक्यात झालेल्या नुकासानी संदर्भात आमदार अभिमन्यु पवार यांनी सरसकट नुकसाण भरपाई देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हातचे पिक गेल्याने पीककर्ज शेतकरी फेडू शकत नाहीत. ते माफ करावे. विमा कंपन्यांना ऑफलाईन अर्ज घेण्याची सुचना करावी आदी मागण्या मांडल्या. पुढे बोलतांना मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. लातुर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात असल्याने तीही मागणी मी मुख्यमंत्र्यासमोर मांडेन. माझ्या बाजूला दोन भाजपाचे केंद्रात वजन असलेले आमदार आहेत. त्यांनीही राजकारण न करता केंद्राकडून कांही मदत मिळते का ते पहावे. कारण संकट भिषण आहे आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहीजे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विमा कंपन्यांच्या कामाबाबत शंका- निलंगेकर 
बाईला पुरुष अन् पुरुषाला बाई करणे सोडून सरकार सर्व कांही करु शकते. संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले की, विमा कंपन्यांना सरकारचा धाक दाखवत विमा मंजुर करुन घ्यावा, हे करत असतांना सरकार काय करु शकते हे आम्हालाही माहीती आहे. फक्त बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई सोडून सरकार कांहीही करु शकते, असा उपरोधक टोलाही आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी विमा कंपण्याच्या कामा बाबत मंत्र्यासमोर लगावला.

(संपादन-प्रताप अवचार)