
करडखेल (ता.उदगीर} येथील एका कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे गेले असता तेथे नागरिकांची गर्दी झाली. या गर्दीत ना खुर्ची.. ना व्यवस्था.. याची वाट न पाहता रस्त्यावरील दगडावर बसून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
उदगीर (लातूर) : करडखेल (ता.उदगीर} येथील एका कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे गेले असता तेथे नागरिकांची गर्दी झाली. या गर्दीत ना खुर्ची.. ना व्यवस्था.. याची वाट न पाहता रस्त्यावरील दगडावर बसून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
करडखेल येथील घुंगरबाई गौतम कांबळे यांचे निधन झाले होते. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी (ता.२०} राज्यमंत्री बनसोडे गेले असता अरुंद वस्तीमधील त्यांच्या घरासमोर मंत्री आल्याचे पाहून नागरिकांनी गर्दी केली व समस्या मांडण्यात सुरुवात केली. खाजगी सुरक्षा रक्षक व त्यांचे कर्मचारी हे गोंधळून गेले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
बसायला खुर्ची नव्हती... त्यातच राज्यमंत्री बनसोडे यांनी हे सर्व माझे नागरिक आहेत. सर्वांनी जवळ या म्हणत सुरक्षारक्षकांना बाजूला करत रस्त्यावरील दगडावर सर्व महिला व नागरिकां समवेत खाली बसले व त्यांच्या समस्या आत्मीयतेने जाणून घेतल्या.
मंत्री काय असतात व ते गाडीच्या काचा सुद्धा खाली न करता फिरणारे मंत्री नागरिकांनी पाहिले होते. मात्र श्री बनसोडे यांनी सर्वांना जवळ बोलून एखाद्या नागरिकाप्रमाणे या गोरगरीब नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना आत्मीयतेने अग्रक्रमाने समस्या सोडवण्याचे आश्वासन देऊन मायेचा हात फिरवला यामुळे नागरिक भावूक झाले होते.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी सामान्यातला सामान्य माणूस...
मी सामान्यातला सामान्य माणूस आहे आपल्या आशीर्वादाने आमदार, मंत्री झालो. मी तुमचे कामे करणारा मंत्री बनणार आहे. मला सुरक्षेची गरज नाही, ना बसण्यासाठी खुर्चीची आवश्यकता नाही. राज्य शासनाच्या सर्व योजना तुमच्या पर्यंत पोहचवणे हेच माझे ध्येय असल्याचे यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी नागरिकांना सांगितले.
(संपादन-प्रताप अवचार)