esakal | लाल परीला पन्नास दिवसात मिळाले तीन कोटींचे उत्पन्न!
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

लाल परीला पन्नास दिवसात मिळाले तीन कोटींचे उत्पन्न!

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गामुळे अधून- मधुन होणाऱ्या लॉकडाउनचा आर्थिक फटका एस.टी. महामंडळाला सहन करावा लागत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे दीड महिन्यापासून बस बंद होती त्यामुळे जवळपास सव्वा कोटीचे आर्थिक उत्पन्न बुडाले. दरम्यान अॅनलॉकमुळे बससेवा सात जुनपासून पूर्ववत सुरू करण्यात आली होती तेंव्हापासून पन्नास दिवसात तीन कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यांच्या सीमेवर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरगा आगाराला महाराष्ट्रातील फेऱ्यातुन उत्पन्न अधिक मिळते. मात्र मध्यंतरी 'ब्रेक द चेन'मुळे दिड महिन्यापासून बससेवा बंद होती. उमरगा आगाराने ६ जूनला पूणे येथे दोन बसेस सोडल्या होत्या. सात जूनपासुन पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, अक्कलकोट, निलंगा तर ग्रामीण भागात मोजक्या गावात बस सेवा सुरु केली होती. कालांतराने बसफेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

उमरगा आगार उत्पन्नात अव्वल-

कोरोनामुळे बससेवा खंडित झाल्यानंतर सात जुनपासुन प्रवाशी मिळवण्यासाठी एस. टी. महामंडळाला बरेच प्रयत्न करावे लागले. जुन महिन्यात चार लाख ७५ हजार किलोमीटर अंतरातून एक कोटी ३३ लाखाचे उत्पन्न मिळाले तर एक ते २५ जुलै पर्यंत सहा लाख ४० हजार किलोमीटर अंतरातून एक कोटी ६८ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी जून, जुलैमध्ये केवळ आठ लाख उत्पन्न झाले होते मात्र या वर्षीची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. दरम्यान लातूर येथे दररोज जाण्या - येण्याच्या ५४ फेऱ्या तर पूण्यासाठी अठरा फेऱ्या होतात यातून आगाराच्या तिजोरीत चांगली भर पडते. आगार व्यवस्थापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या योग्य नियोजनामुळे व प्रवाशांची साथ मिळाल्याने उमरगा आगाराचे आर्थिक उत्पन्न मराठवाड्यात (औरंगाबाद रिजन) प्रथम क्रमांकावर आहे.

हेही वाचा: डेंगी, चिकनगुन्याने काढले ग्रामीण भागात डोके वर

खिळखिळ्या बसेसवर सुरु आहे प्रवास-

उमरगा आगारात एकुण ८४ पैकी सहा बसेस मालवाहुसाठी आहेत, तर ७८ बसेस कार्यरत आहेत मात्र त्यापैकी जवळपास ३५ बसेसची अवस्था खिळखिळी झाली आहे, मोडकळीस आलेल्या खिडक्या, आसन व्यवस्थेची दुरावस्था तर आग नियंत्रणाची सोय नसल्याने प्रवाशांना आहे त्या स्थितीत प्रवास करावा लागतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात ११५ बसफेऱ्या सुरु झाल्या आहेत, आणखी २५ फेऱ्या बंद आहेत. आगाराने औराद शहाजनी आणि तुगांव या दोन गावांना नवीन फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान उपलब्ध मनुष्यबळ आणि बसेसवर उत्पन्नात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी आगाराला सुसज्ज अशा बसेस महामंडळाने दिले तर उत्पन्नात आणखी भर पडेल.

हेही वाचा: कोरोना योद्ध्यांच्या मुलांचे शिक्षण थांबले, कोणी उधारही देईना

" कोरोनामुळे बससेवा बंद करावी लागली होती. ऑनलॉकनंतर ती सुरू करण्यात आली. चालक, वहाक व यांत्रिक कामगार यांनी केलेले सचोटीचे प्रयत्न उत्पन्नवाढीसाठी महत्वाचे ठरत आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांचा प्रतिसाद महत्वाचा ठरत आहे. महिनाकाठी दोन ते अडीच कोटीचे उत्पन्न असते मात्र सध्या दिड कोटीपर्यंत उत्पन्न मिळते आहे. दोन ते अडीच कोटीचा पल्ला गाठण्यासाठी प्रयत्न सुरु आहे."

-पी. व्ही. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक

loading image
go to top