...म्हणून जास्तीच्या निविदेतून उभारणार शिवरायांचा पुतळा 

Statue of Chhatrapati ShivaJi Maharaj at BAMU University
Statue of Chhatrapati ShivaJi Maharaj at BAMU University

औरंगाबाद : शतकुंदा आर्टस्‌ची निविदा 44 लाखांची होती. त्यापेक्षाही कमी किंमतीच्या निविदा होत्या. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आमच्या सहभागातून रक्‍कम जमा करा, पण हीच कलाकृती अंतिम करावी, अशा सूचना केल्या. कलाकृतीही सुंदर असल्याने सदस्यांनी हे मत नोंदविले होते. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबतचे सर्व अडथळे दुर झाले असून येत्या सहा महिन्यात नियोजित स्थळी पुतळा बसविला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. 

अधिसभा बैठकीत शनिवारी (ता. 16) पुतळ्याच्या निविदेवरुन चर्चा झाली. कमी निविदा भरणाऱ्यांना हे काम का देण्यात आले नाही. असा प्रश्‍न सदस्यांनी कुलगुरुंना प्रश्‍नोत्तरावेळी विचारला. कुलगुरु म्हणाले, विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी निविदा प्रक्रियेनंतर शिल्पकाराची ही नेमणुक झाली आहे. पाच निविदापैकी एक तांत्रिकदृष्ट्या बाद ठरली. त्यानंतर चार संस्था अंतिमसाठी निवडण्यात आल्या. अंतिम शिल्पकार निवडल्यानंतर शिल्पकाराला बोलावले तर, त्यांनीही आम्ही या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून आमचाही सहभाग असावा, म्हणून ही रक्‍कम 38 लाख रुपयांपर्यंत अंतिम झाली आहे. 

अशी केली शिल्पकाराची निवड.. 
अंतिम शिल्पकाराची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली. यात जेजे आर्टस्‌चे विश्‍वनाथ साबळे आणि विद्यापीठाचे दोन सदस्य यात होते. त्यांनी कार्यशाळेस भेट दिली. त्यानंतर फायबरची कलाकृती सादर करण्यास सांगितली. मॉडेल आल्यानंतर शिल्पकाराचे नाव वगळून व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसमोर ठेवल्या. पाहणीत दोन कलाकृती आवडल्या. त्या दोन्ही शतकुंदा आर्टस्‌च्या होत्या. 

सुशोभिकरणासाठी होणार स्पर्धा.. 
विद्यापीठानेही कलेचा मान ठेवला. पुढील सहा महिन्यात पुतळ्याचे काम पुर्ण होईल. सुशोभिकरणासाठी सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी आर्किटेक्‍चर निवडण्यात येईल. तत्पूर्वी आयडिया समोर येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धादेखील ठेवण्यात येईल. अशी माहिती कुलगुरुंनी दिली. 

पाच वर्षापासूनची मागणी... 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. यावर फेब्रुवारी 2015 मध्ये पुतळा उभारणीला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ग्रीन सिग्नल मिळाला होता. त्यानंतर 2017-18मध्ये दबाव वाढल्यानंतर पुतळ्यासाठी 40 लाख रुपयांची तरतुद केली. त्यानंतरही याकामी गती मिळत नव्हती. आता हा प्रश्‍न निकाली निघाला आहे.

हेही वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com