esakal | गुलाबी थंडीत रंगली 'स्ट्रीटस् फॉर पिपल' ची मैफल!
sakal

बोलून बातमी शोधा

smart city.jpg

स्मार्ट सिटी योजनेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शुक्रवारी (ता. १३) गुलाबी थंडीत ‘स्ट्रीट फॉर पिपल’चा उपक्रम ऐतिहासिक पैठणगेटच्या साक्षीने रंगला.

गुलाबी थंडीत रंगली 'स्ट्रीटस् फॉर पिपल' ची मैफल!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शुक्रवारी (ता. १३) गुलाबी थंडीत ‘स्ट्रीट फॉर पिपल’चा उपक्रम ऐतिहासिक पैठणगेटच्या साक्षीने रंगला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या शहरी विकास खात्याने ‘स्ट्रीटस् फॉर पिपल’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानुसार शुक्रवारी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या कलाकारांनी पहाटेच्या थंडीत चित्रे रेखाटली, गायकांनी गायन केले, वाद्यवृंदांनी वाद्ये वाजवली. महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी उपक्रमाला भेट दिली. त्यांनी पैठणगेट ते गुलमंडी हा रस्ता ‘स्ट्रीट फॉर पिपल’साठी करण्याची घोषणा केली. त्यासाठी या रस्त्यावरील दुकानदार, व्यावसायिकांशी देखील चर्चा केली जाईल. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् , साहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, स्नेहा बक्षी उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सहा हजार जणांचा ऑनलाइन सहभाग 
कार्यक्रमात सुमारे शंभर नागरिक सहभागी झाले. मात्र सुमारे सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी नागरिकांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे, यासाठी काळजी घेण्यात आल्याचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image