esakal | विद्यार्थी घरी, शिक्षक शाळेच्या दारी, कुठे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

school

हिंगोली जिल्ह्यांतील शाळा सोमवारी विद्यार्थ्यांविना सुरू झाल्या आहेत. यामध्ये शाळेत शिक्षकांचीच शंभर टक्के उपस्थिती होती. तसेच तालुक्‍यातील वरुडगवळी येथील शाळेत शाळा व्यवस्‍थापन समितीची बैठक यानिमित्ताने घेण्यात आली.

विद्यार्थी घरी, शिक्षक शाळेच्या दारी, कुठे ते वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्‍ह्यात शाळा पूर्वनियोजनासाठी शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीची सोमवारी (ता.२२) शाळेत बैठक घेऊन पहिल्या दिवसाची सुरवात जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे व्हॉट्सॲपवर मॅसेज टाकून आदेश दिल्याने सर्व शिक्षक सकाळी साडेनऊ ते चारपर्यंत शाळेत उपस्थित होते.

दिवसभरामध्ये मुख्याध्यापकांनी शाळा पूर्वनियोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक यांची बैठक घेतली. बैठकीत शासनाच्या (ता.१५) जूनच्या निर्णयाचे वाचन करून दोन आठवड्यांत शाळेच्या वेळेत कोणकोणते काम करायची, त्याची जबाबदारी कोणाकडे असेल हे मुख्याध्यापकांनी सर्वांना सांगितले. त्‍याप्रमाणे हिंगोली तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड गवळी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख डॉ. तुकाराम कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

हेही वाचा - Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच

शिक्षकांना विविध सूचना 
या वेळी मुख्याध्यापक सुभाष बेंगाळ यांनी शासन निर्णयानुसार दोन आठवड्यांत शाळा पूर्वनियोजनामध्ये कोणकोणते कामे करायचे याचे नियोजन तयार करून शिक्षकांना कामाचे वाटप केले. या कालावधीत विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करणे वर्गाचे वाटप करून वर्गवार विद्यार्थी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे, दररोज त्यांना अभ्यास देणे, अशा सूचना देण्यात आल्या. या वेळी शाळेतील शिक्षक सुभाष जिरवणकर, शिवाजी देशमुख, संजय मुधोळ, फुलचंद महाजन, गोविंद चुनडे, साहेबराव दीपके, संगीता देशमुख, अंजली देशमुख, करुणा वाठोरे, रेखाबाई धुळे, अरुणाबाई वाव्हळ आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - सोयाबीनच उगवलेच नाही; मग सुरू झाला तक्रारींचा ओघ

शाळेची घंटी वाजलीच नाही 
शेवाळा ः कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा येथे विद्यार्थ्यांविना शाळा प्रथमच सुरू झाली. आज शाळेची घंटी वाजलीच नाही. शाळेत मुख्याध्यापक, शिक्षकांनी हजेरी लावली. बाहेरगावी राहणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती बऱ्यापैकी होती. शाळेतील विलगीकरण कक्षात रविवारी (ता. २१) रात्री उशिरापर्यंत पुणे येथून आलेले सात जणांना असल्याचे मुख्याध्यापक रमेश सूर्यवंशी यांनी सांगितले. या वेळी एस. के. जमजाळ, बी. एच. आडे, शिक्षक बी. एच. तेलावर, राजू व्यवहारे यांनी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षा अँड्रॉइड ॲपवर आॅनलाइन अभ्यासक्रम सुरू केला असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आॅनलाइन दीक्षा ॲपवर अभ्यास केला आहे.