esakal | मराठवाड्यातील विद्यार्थ्‍यांचे होतेय ‘सैन्य’ क्षेत्राकडे दुर्लक्ष, जाणून घ्या का?
sakal

बोलून बातमी शोधा

0Career_37

पदवी, अभियांत्रिकीची पदवी असावी लागते. शिवाय मरीन नेव्‍हीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पदांसाठीच्‍या संधी निर्माण झाल्‍या आहेत.

मराठवाड्यातील विद्यार्थ्‍यांचे होतेय ‘सैन्य’ क्षेत्राकडे दुर्लक्ष, जाणून घ्या का?

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : मराठवाड्यात बारावीपासून ते पदवी आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांचे सैन्यदलात उपलब्‍ध असलेल्‍या विविध संधीकडे अद्यापही दुर्लक्षच होत आहे. या क्षेत्रात मोठ्या संधी विविध अभ्‍यासक्रमाअंती मिळवता येऊ शकतात, असे मत कर्नल सचिन रंदाळे यांनी व्‍यक्‍त केले.


राजर्षी शाहू महाविद्यालय आणि फ्लाइट कॅडेट प्रसाद शेंडगे मेमोरियल फाउंडेशन यांच्‍यातर्फे आयोजित व्‍यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत ते बोलत होते. शिव छत्रपती शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. गोपाळराव पाटील अध्‍यक्षस्‍थानी होते. संरक्षण क्षेत्रात शॉर्टसर्व्हिस कमिशनच्‍या माध्‍यमातून तांत्रिक व अतांत्रिक क्षेत्रातील असंख्‍य संधी आहेत.

कोरोनातून मुक्त झाल्यावर आता काय, डॉक्टर म्हणतात..

त्‍याकरिता पदवी, अभियांत्रिकीची पदवी असावी लागते. शिवाय मरीन नेव्‍हीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पदांसाठीच्‍या संधी निर्माण झाल्‍या आहेत. यासाठी लातूर जिल्‍ह्यातील विद्यार्थ्‍यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राव्‍यतिरिक्‍त करिअरचे क्षेत्र म्‍हणून संरक्षण क्षेत्राची निवड केली, तर त्‍यांना या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.


महाविद्यालयाने आजपर्यंत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्‍यासाठी हजारो विद्यार्थ्‍यांना संधी उपलब्‍ध करून दिली. त्‍याचप्रमाणे विद्यार्थ्‍यांनी संरक्षण क्षेत्रात जाण्‍यासाठी इच्‍छा व्‍यक्‍त केल्‍या किंवा विद्यार्थी तयार असतील, तर शाहू महाविद्यालयाच्‍या वतीने या क्षेत्रात जाण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा संस्‍थेतर्फे पुरवल्‍या जातील, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.


प्राचार्य डॉ. महादेव गव्‍हाणे आणि फ्लाइट कॅडेट प्रसाद शेंडगे मेमोरियल फाउंडेशनचे अध्‍यक्ष डॉ. रमाकांत शेंडगे यांनी प्रास्‍ताविक केले. डॉ. अनुजा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्‍यांचा परिचय डॉ. ओमप्रकाश शहापूरकर यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार डॉ. अभिजीत यादव यांनी मानले. यावेळी भारत माळवदकर, कैलास गिरवलकर, डॉ. राजेंद्रप्रसाद आर्य, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, डॉ. अभिजित यादव उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर