उमरग्यात अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य; दोन महिलांना तीन दिवसाची पोलिस कोठडी

अविनाश काळे
Friday, 6 November 2020

नाईचाकूर येथील (कै.) हैदर महेबुब मुल्ला यांच्या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पुजा करणार असल्याची माहिती तीन नोंव्हेबरला समजल्यानंतर पोलिस पाटील बाळू स्वामी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठठल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद माधवराव पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली असता एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला. 

उमरगा (उस्मानाबाद) : घरातील व्यक्ती आजारी रहात असल्याने अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य करण्याचा प्रकार तालुक्यातील नाईचाकूर येथे तीन नोव्हेंबर उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या कृत्यात सहभागी असलेल्या दोन महिलांना शुक्रवारी (ता. सहा) अटक केली. दरम्यान न्यायालयाने दोन्ही महिलांना रविवारपर्यंत (ता. आठ) तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या बाबतची माहिती अशी की, नाईचाकूर येथील (कै.) हैदर महेबुब मुल्ला यांच्या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पुजा करणार असल्याची माहिती तीन नोंव्हेबरला समजल्यानंतर पोलिस पाटील बाळू स्वामी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठठल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद माधवराव पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली असता एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबु असे पुजाचे साहित्य पुजा करून पडलेले होते. तसेच बाजुस दोन टिकाव, फावडा पडलेला दिसून आला व बाजूचे खोलीमध्ये तीन कलताणी पोते, दोन लिंबु व नारळ असे साहित्य अघोरी प्रथा व जादुटोना करून पडलेले दिसले. या बाबत गावातील सर्व लोकांनी तैसिन पाशामियाँ मुल्ला यांना विचारपुस केली असता तिने सांगितले की, उमरगा येथील बहीण नसरिन शौकत पटेल ही जास्त आजारी पडत असल्यामुळे तिला कोणीतरी सांगितले की, तुम्ही तुमच्या बंद घरात खड्डा खोदुन त्यात नारळ, लिंबु पुजा करून टाका. तुमचा आजार बरा होईल असे सांगितले. त्यानुसार आम्ही तेथे पूजा करणार होतो. असे सांगितले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

परंतू हा प्रकार अंधश्रद्धेतुन केल्याचे दिसल्याने पोलिस पाटील श्री. स्वामी यांनी फिर्याद दिल्यानंतर तैसिन मुल्ला, नसरिन शौकत पटेल अरबाज पटेल यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तैसिन मुल्ला, नसरिन पटेल यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रमाकांत शिंदे यांच्याकडे आहे, आता तपासात चार बाय चार आकाराच्या मोठया खड्डात नेमके कोणते अघोरी कृत्य केले जाणार होते याची चौकशी केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superstition case Two women remanded in police custody for three days