कौतुकास्पद...! प्लाझ्मा दान करण्यासाठी 'ते' आले पुढे

सुशांत सांगवे
Wednesday, 29 April 2020

प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊ शकतात, ही माहिती कळताच कोरोनाशी यशस्वी लढा दिलेले 'ते' परप्रांतीय नागरिक आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आले आहेत. एकमेकांच्या मदतीला धावून जाणे, हाच खरा धर्म आहे, अशी भावनाही हे नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कौतुक केले आहे.

लातूर : प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊ शकतात, ही माहिती कळताच कोरोनाशी यशस्वी लढा दिलेले 'ते' परप्रांतीय नागरिक आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आले आहेत. एकमेकांच्या मदतीला धावून जाणे, हाच खरा धर्म आहे, अशी भावनाही हे नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कौतुक केले आहे.

हरियाणा राज्यातील फिरोजपुर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरू २ एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील एका धार्मिक स्थळी आढळून आले होते. या बारा जणांच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर त्यातील 8 जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

या सर्वांची वेळोवेळी तपासणी, उपचार केल्यानंतर त्यांचा अंतिम अहवाल 18 एप्रिल रोजी निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. सध्या हे आठही जण निलंगा येथे क्वारंटाईनमध्ये आहेत. यावेळी त्यांना मोबाईलवर प्लाझ्मा थेरपीची माहिती मिळाली. कोरोनातुन बरे झालेल्यांना प्लाझ्मा दान करता येतो, हे कळल्यानंतर त्यांनी तातडीने 'आम्ही प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार आहोत', अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचवली. याचा उल्लेख जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये केला.

सहा महिन्यांच्या बाळाचे शिर कापून फेकले, कुत्र्याने पळवले

माणूस जगणे महत्वाचे

लातूरकरांच्या सहकार्यामुळेच आम्ही आठजण कोरोनामुक्त झालो आहोत. हे आम्ही कधीही विसरणार नाही. मदतीची ही भावना मनात ठेवून आमच्यापैकी सात जणांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित एक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. मदतीतून कोणाचे तरी जीवन वाचणे आणि माणूस जगणे महत्वाचे आहे, अशी भावना कोरोनामुक्त झालेले समीर (नाव बदललेले आहे) यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tablighi Jamatis Came Forward To Donate Plazma Latur News