अॅन्टीजेन चाचणीत शिक्षक 'उत्तीर्ण'!

अविनाश काळे
Thursday, 19 November 2020

उमरगा : कोरोना चाचणीत शिक्षक निगेटिव्ह ; उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली चाचणी

उमरगा (उस्मानाबाद) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे गेल्या सात महिन्यापासुन बंद असलेले शाळांचे प्रवेशद्वार सोमवारपासून (ता.२३) उघडण्यात येणार असल्याने तत्पूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने गुरूवारी (ता.१९) गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने केलेल्या नियोजनानुसार पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व मुरूम, उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या चाचणीत  शिक्षकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरला नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने शाळेतील सर्वच शिक्षक व कर्मचारी यांची कोरोणा चाचणी होणे बंधनकारक असल्याने गटशिक्षण विभागाने केलेल्या नियोजनानुसार येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २९ गावातील शिक्षकांची रॅपिड अन्टीजेन चाचणी घेण्यात आली. जकेकूरच्या ज्ञानप्रबोधनी विद्यालयाचे शिक्षक संतोष बिराजदार यांच्यापासून चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली. डॉ. साईनाथ जळकोटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुधिर जाधव, औषध निर्माता विजय धामशेट्टी, आरोग्य सेवक सुर्यकांत घंटे, अमोल जोशी, सिद्राम कस्तुरे, सुजित जगताप, हरि चव्हाण, राजेंद्र गायकवाड यांनी केलेल्या नियोजनाला महाराष्ट्र राज्य प्राथामिक शिक्षक समितीचे राज्य संघटक प्रदीप मदने यांनी सहकार्य केले. दरम्यान नाईचाकूर, आलूर, मुळज, येणेगुर, गुंजोटी प्राथमिक आरोग्य केंद्र व उमरगा उपजिल्हा रुग्णालय व मुरूम ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी शिक्षकांची तपासणी करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अडीचशे शिक्षक निगेटिव्ह
उमरगा तालुक्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संख्या ६२३ आहे. दोन दिवसाच्या नियोजनाप्रमाणे कोरोना चाचणी करण्यात येत आहे. गुरूवारी उपजिल्हा रुग्णालयातील ९१ शिक्षकांच्या चाचणीत सर्वचण निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. प्रविण जगताप यांनी दिली तर मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सर्वच ५१ शिक्षकांच्या चाचण्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ.डूकरे यांनी सांगितले तर पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात २३६ झालेल्या चाचण्यात बहुतांश शिक्षक होते. त्यातील जे शिक्षक नाहीत असे दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. तर सर्वच शिक्षकांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळूंके यांनी सांगितली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. गुरुवारी झालेल्या तपासणीत एकही शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. आणखी दोन दिवसात उर्वरीत शिक्षकांची चाचणी नियोजना प्रमाणे करण्यात येणार आहे. शिक्षकांनी ज्या त्या संबंधित आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher pass corona antigen test