esakal | अनुदानासाठी निराधाराकडे मागितली ‘चिरीमिरी’ 
sakal

बोलून बातमी शोधा

लाच.jpg

तहसीलमधील खासगी ऑपरेटर लाच घेताना पकडला 

अनुदानासाठी निराधाराकडे मागितली ‘चिरीमिरी’ 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : संजय गांधी निरीधार योजनेंतर्गत मंजूर झालेले अनुदान बॅंक खात्यात जमा करण्यासाठी तहसील कार्यालयातील एका खासगी ऑपरेटरला बुधवारी (ता.२३) दोन हजार ४०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


तक्रारदारांना संजय गांधी निरीधार योजनेंतर्गत १२ हजार ४०० रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. हे मंजूर अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी त्यांना तहसील कार्यालयातील खासगी ऑपरेटर पवन दत्तात्रय राऊत (वय २३) याने दोन हजार ४०० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची १० सप्टेंबरला पडताळणी करण्यात आल्यानंतर खासगी ऑपरेटरने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर बुधवारी (ता.२३) जालना तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला व मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी पवन राऊत याला तहसील कार्यालयाच्या गेटजवळ दोन हजार ४०० रुपयांची लाच घेताना पंचासमक्ष पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, कर्मचारी ज्ञानदेव झुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, आत्माराम डोईफोडे, ज्ञानेश्वर म्हस्के, शिवाजी जमधडे, सचिन राऊत, जादेव शेख, आरेफ शेख यांनी केली.