मजुरांच्या मदतीसाठी तहसीलदार शेवाळेंचा पुढाकार

संजय मुंडे
Wednesday, 25 March 2020

संचारबंदीत अडकलेल्या पाच मजुरांच्या कुटुंबना अन्न धान्य व जिवनावश्यक वस्तूंचा केला पुरवठा
 

वालूर (ता.सेलू,जि.परभणी) : ‘कोरोना’ विषाणू(कोवीड-१९) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भावामुळे संचारबंदीत अडकलेल्या पाच मजुरांच्या कुटुंबना अन्न धान्य व जिवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी सेलूचे तहसीलदार श्री बालाजी शेवाळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांचा या कार्यतत्परतमुळे तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 

‘कोरोना’ विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासनाकडून  सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शासकीय विभागाना दिलेल्या आदेशानुसार  शासकीय यंत्रणेने कटाक्षाने अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यातील जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्याने नागरिकांचे येणे जाणे थांबले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाच्या जनता कर्फ्यु नंतर मंगळवारी (ता.२४) संपूर्ण देशात २१ दिवसाचा लाॅकडाऊन जाहीर केला. 

हेही वाचा व पहा - Video: लढाई निश्चित जिंकणार; पण तुम्ही घर सोडू नका
सेलू तालुक्यातील मौजे पार्डी (कौसडी) येथील अंबादास ताराचंद आढे, अनिल प्रकाश राठोड, जगदीश देविदास राठोड, कृष्णा प्रेमसिंग चव्हाण व पप्पु रमेश राठोड हे पाच मजुर आपल्या कुटुंबासह चार ते पाच महिन्यांपासून उदरनिर्वाहासाठी पालघर जिल्हातील अंबेवली (ता.विक्रमगड) या ठिकाणी गेलेले आहेत. ‘कोरोना’ विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे या मजुरांसमोर उपजीविकेचे संकट निर्माण झाले. मौजे पार्डी (कौसडी) गावच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर राठोड यांनी तहसीलदार बालाजी शेवाळे यांना संबंधित मजुरांविषयी कळविले. तसेच गावांकडून मदत पाठविली. 

हेही वाचा - रेल्वे स्थानकासह शहरातील भिक्षेकरी बेवारस

विक्रमगडच्या तहसीलदारांना दिले पत्र
‘कोरोना’ विषाणू या संसर्गजन्य रोगाचा बंदोबस्तासाठी सेलू तालुक्यातील महसूल प्रशासनाने जोरदार पावले उचलली असून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे स्वता: शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात  पोलिस, कृषी विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत या सर्वांनासोबत घेऊन अहोरात्र जनजागृती करत आहेत. तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी मौजे पार्डी (कौसडी) येथील वरील पाच मजुरांच्या कुटुंबियांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू मिळव्यात यासाठी पुढाकार घेतला. विक्रमगड (जि.पालघर) चे तहसीलदार यांना बुधवारी (ता.२५) पत्राद्वारे मजुरांविषयी माहिती दिली. तहसीलदार श्री शेवाळे यांच्या या कार्यतत्परतेमुळे सरपंच राठोड व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar algae initiative to help the laborers