esakal | जिंतूरातील ‘त्या’ बाधित तिघांच्या संपर्कात दहाजण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे आपल्या मूळ गावी आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीसह दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी रात्री उघड झाली. परंतु, पोलिस कर्मचारी निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या त्या महिलेसह दोन मुलांच्या संपर्कात इतर दहा व्यक्ती आल्या होत्या. 

जिंतूरातील ‘त्या’ बाधित तिघांच्या संपर्कात दहाजण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : मुंबईहून आलेल्या त्या तीन पूर्ण बाधित रुग्णांच्या संपर्कात इतर दहाजण आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या दहाजणांचा शोध घेणे सुरू असून त्यांची तपासणीदेखील केली जाणार आहे.

जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे आपल्या मूळ गावी आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीसह दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी रात्री उघड झाली. परंतु, पोलिस कर्मचारी निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या त्या महिलेसह दोन मुलांच्या संपर्कात इतर दहा व्यक्ती आल्या होत्या. हा पोलिस कर्मचारी मुंबईतील आर्थर रोड जेल येथे कार्यरत आहे. मुंबई येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आपल्या कुटुंबाला घेऊन शेवडी (ता. जिंतूर) येथे आला होता. 

हेही वाचा - तीन कोरोना रुग्ण निघाल्याने जिंतूरकरांनी पाळला कडकडीत बंद...

‘ते’ तीन पॉझिटिव्ह जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल
परभणी : मुंबईहून मूळ गावी शेवडी (ता. जिंतूर) येथे परतलेल्या एका महिलेसह तिच्या दोन मुलांना कोरोनाची लागण गुरुवारी (ता. १४) रात्री झाल्याचा अहवाल आला आहे. या तिघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेवडी (ता. जिंतूर) येथील रहिवाशी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये गार्ड म्हणून पोलिस कर्मचारी कार्यरत होता. तो जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचा रहिवासी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्या परिवाराला घेऊन गावाकडे तो निघाला. जिंतूरला आल्यानंतर त्याने पत्नी आणि दोन मुलांची तपासणी करून घेतली होती. तपासणी अहवाल येईपर्यंत त्या कुटुंबाला डॉक्टरांनी क्वारंटाइन केले होते. गुरुवारी (ता. १४) रात्री त्यांचा अहवाल आला. त्यामध्ये पोलिस कर्मचारी हा निगेटिव्ह निघाला आहे. परंतु, त्याची पत्नी व दोन मुले हे पॉझिटिव्ह निघाले आहेत. आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.


हेही वाचा - सकाळ इम्पॅक्ट ; दोन जेसीबी कंत्राटदाराकडे सुपूर्द

शेवडीमध्ये आरोग्य पथकांची स्थापना
परभणी ः शेवडी (ता. जिंतूर) येथे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या वतीने अकरा पथकांची स्थापना करून गावकऱ्यांमध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. जिंतूर पंचायत समिती आणि परभणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग यंत्रणेने गावात भेट दिली. या वेळी गावामध्ये हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांमधील भीती दूर करण्यात आली. गावातील इतर दोन कुटुंबांना क्वारंटाइन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने गावात अकरा पथकांची स्थापना करून गावातील कुटुंबांचे सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. या वेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सुरेश शेजूळ, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर व त्यांची सर्व यंत्रणा, विस्तार अधिकरी एन. एल. आडते, ग्रामसेवक पी. डी. खुळखुळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

परभणी जिल्हा कोरोना रुग्ण अहवाल
एकुण बाधित - चार
उपचार सुरु असलेले - तीन
बरे झालेले रुग्ण - एक