Coronavirus : धक्कादायक...! उदगीरमध्ये एकाच दिवशी दहा रुग्ण

सुशांत सांगवे
Saturday, 16 May 2020

लातूर जिल्ह्या पुन्हा एकदा हादरला आहे. उदगीरमधील उपचार घेत असलेल्या कोरोनाबधितांची संख्या आता 19वर पोहोचली आहे.

लातूर :  जिल्ह्यातील उदगीरमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच एकाच दिवशी आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आज (ता. 16 मे) रात्री पुढे आली. त्यामुळे लातूर जिल्ह्या पुन्हा एकदा हादरला आहे. उदगीरमधील उपचार घेत असलेल्या कोरोनाबधितांची संख्या आता 19वर पोहोचली आहे.

उदगीरमध्ये कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उदगीर लवकरच कोरोनामुक्त होईल, असे संकेत वर्तवले जात होते. पण, त्यातच उदगीरमधील आणखी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शनिवारी एकुण 96 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथून आलेले एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले.

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

त्यातील 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 3 व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नसल्यामुळे त्यांची उद्या (ता. 17) पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. हे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापूर येथील एका व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उस्मानाबाद येथील 61 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली तर बीडमधील 10 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी झाली, असे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी सांगितले. 

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे
 
कोरोना मीटर
 

  • एकूण बाधित : 49
  • उपचार सुरू : 19
  • बरे झालेले : 29
  • मृत्यू : 01

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten New Cases Of COVID-19 in Udagir dist Latur