शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून दहा टक्के उपस्थिती 

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन
Updated on

नांदेड - राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती दहा टक्के इतकी ठेवण्यात यावी. या अनुषंगाने रोटेशन पद्धतीने कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयीन सचिव, संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी (ता. १८ एप्रिल) शासन निर्णयाद्वारे आदेशीत केले आहे. त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

कोरोना विषाणूंचा (कोव्हीड १९) प्रसार राज्यातील कार्यालयामध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाकडून शासन आदेशान्वये विविध सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. शासन अधिसुचनेनुसार राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी ता. तीन मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

राज्य शासनाचा सुधारित आदेश
शासन निर्णय ता. २३ मार्च अन्वये शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती पाच टक्के इतकी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. आता ता. १५ एप्रिल रोजीच्या अधिसुचनेनुसार लॉकडाऊनचा कालावधी ता. तीन मे पर्यंत वाढविण्यात आल्या असल्याची बाब विचारात घेऊन तसेच या संदर्भात सर्वंकष विचार करुन राज्याच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत राज्य शासनाने पुढीलप्रमाणे सुधारित शासन निर्णय ता. १८ एप्रिल रोजी निर्गमीत केला आहे. त्यानुसार नांदेडला देखील जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी याबाबतचे आदेश काढले असून त्यात काय सुरु राहील आणि काय बंद राहील याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

सोमवारपासून आदेश अंमलात
संपूर्ण राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती दहा टक्के इतकी ठेवण्यात यावी. या अनुषंगाने रोटेशन पद्धतीने कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयीन सचिव संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. तथापि मंत्रालयातील सर्व सह उपसचिवांनी कार्यालयात उपस्थित रहाणे बंधनकारक राहील. यापैकी महिला अधिकाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीपासून सूट देण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन सचिवांना कार्यालय प्रमुखांना राहतील. या उपस्थितीबाबतचे आदेश सोमवारपासून (ता. २० एप्रिल) अंमलात येतील. या आदेशाचा भंग करणारे अधिकारी, कर्मचारी हे शिस्तभंगाविषयक कार्यवाहीस पात्र राहतील.

सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अत्यंत आवश्यक
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सींग ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या बसेसची संख्या पुरेशी नसल्याने त्यामध्ये अत्यंत गर्दी होत असल्याने कर्मचाऱ्यांना विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयात जाण्यास इच्छूक नसल्याचे दिसते. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhokardan Theft
The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Marathi News Esakal
www.esakal.com