esakal | लोअर दुधना प्रकल्प धरणात अकरा दलघमी पाण्याची आवक
sakal

बोलून बातमी शोधा

लोअर दुधना प्रकल्प धरणात अकरा दलघमी पाण्याची आवक

गेल्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार वर्षानंतर लोअर दुधना प्रकल्प धरण शंभर टक्के भरले होते.

लोअर दुधना प्रकल्प धरणात अकरा दलघमी पाण्याची आवक

sakal_logo
By
विलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सेलू (परभणी) : लोअर दूधना प्रकल्पाच्या (lower dudhna project) पाणलोट क्षेत्रात पाऊस (Rain) जोरदार बरसत असल्याने लोअर दुधना प्रकल्पात जून महिन्यातच तब्बल ११.१२१ दलघमी पाण्याची आवक वाढली असल्याने शेतकर्‍यांसह नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. (the inflow of water in the lower dudhna project dam has increased)

हेही वाचा: सेलू तालुक्यातील कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्याची गरज

जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर लोअर दुधना प्रकल्पात पाणी येते. लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्याच्या सुरूवातीसच जून महिन्यात जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे लोअर दुधना प्रकल्पाच्या जलाशयात पाण्याची वेगाने आवक होत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार वर्षानंतर लोअर दुधना प्रकल्प धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून तीन पाणी पाळ्या देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: सेलू पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह; २३ दुचाकी चोरट्यांनी केल्या लंपास

उन्हाळी पिकांना दोन्ही कालव्यातून पाणी सोडले होते. दुधना नदीकाठावरील गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने लोअर दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे लोअर दुधना प्रकल्पाच्या नदीकाठावरील पन्नास गावांची तहान भागली होती. लोअर दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून सेलू शहराला पाणी पुरवठा केला जातो. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेकडो गावांची पाण्याची मदार आहे. तसेच सेलू, जिंतूर आणि परभणी तालुक्यातील हजारों शेतकर्‍यांना दूधनेच्या पाण्याचा आधार मिळतो.

हेही वाचा: सेलू तालुक्यातील शेतकरी खरिप हंगामासाठी सज्ज

दरवर्षी सप्टेंबर आणि आॅक्टोंबर महिन्यात दूधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते. मात्र प्रथमच जून महिन्यात लोअर दूधना प्रकल्प धरणात ११.१२१ दलघमी पाणी आले आहे. यंदाही धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोअर दूधना प्रकल्प धरणात गेल्या वर्षी शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी देण्यात आले. तसेच दूधना नदिपात्रातही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील जलसाठा निम्म्यावर आला होता. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीसच धरणात आवक सुरू झाल्याने सद्य:स्थितीत धरणात ५४.७९ जिवंत जलसाठा उपलब्ध झाला आहे. (the inflow of water in the lower dudhna project dam has increased)

loading image