लोअर दूधना नदी पात्रात लवकरच पाणी सुटणार; नदीकाठच्या गावांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

loar dam

लोअर दूधना नदी पात्रात लवकरच पाणी सुटणार; नदीकाठच्या गावांना दिलासा

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोअर दूधना प्रकल्प (Loar Dudhana Project) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण तुडुंब भरले होते. धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातुन रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी तिन- तिन पाणी पाळ्या सोडण्यात आल्या होत्या. उन्हाळ्यात नदीकाठच्या (river side village's alert) गावांना, जनावरांना पाणी मिळावे यासाठी दुधना नदी पात्रातुन लवकरच पाणी सुटणार असल्याची माहिती धरण सुत्रांनी दिली. (The Lowe-r Dudhna- River- basin- run- dry- Relief - riverside- villages)

लोअर दुधना प्रकल्प धरण तब्बल दहा वर्षानंतर गेल्यावर्षी पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शंभर टक्के भरले होते.

सद्य: स्थितीत धरणात ६० टक्के इतका उपलब्ध जलसाठा आहे. त्यामुळे गेल्यावर्षी रब्बी हंगामासाठी लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या दोन्ही कालव्यातून तिन पाणी पाळ्या सोडण्यात आल्या होत्या. तर उन्हाळी पिकांसाठी तिन पाणी पाळ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे धरणातील पाण्यामूळे शेतकर्‍यांच्या लाभ क्षेत्रातील तेरा हजार हेक्टर शेतीला लाभ मिळाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगलाच फायदा झाला.

हेही वाचा - गडचिरोली पोलिस स्मृतिदिनीच पोलिसांनी घेतला बदला. नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे

धरणाचा डावा कालवा हा ६९ किलोमीटर असून उजवा कालवा ४८ किलोमीटर आहे. या पाणी पाळीमुळे सेलू , जिंतूर, मानवत व परभणी तालुक्यातील शेतकर्‍यांना या पाण्याचा सिंचनासाठी लाभ मिळाला. धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे लकरच धरणातुन दुधना नदी पात्रात पाणी सोडण्याच्या हलचालींना वेग आला आहे. त्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना व जनावरांना धरणातील पाण्याचा लाभ मिळणार आहे. त्याच बरोबर सेलू शहर, आठ गाव पाणी पुरवठा योजना,मंठा शहर, परतुर शहर व मंठा, परतुर तालुक्यातील १७३ गावांना धरणातील पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळत असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

लोअर दुधना प्रकल्प धरण गेल्यावर्षी शंभर टक्के भरल्यामुळे गेल्यावर्षी रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांसाठी पाणी पाळ्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच उन्हाळा संपत आल्यामुळे नदीकाठच्या गावांना व जनावरांसाठी लवकरच दूधना नदी पात्रातुन पाणी सोडण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता सतिश बागले यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top