esakal | धुपखेडयाच्या साई मंदिरात सोन्या-चांदीच्या दागिन्यासह दानपेटी चोरली! 
sakal

बोलून बातमी शोधा

saimandir.jpg

धुपखेडा येथील साई मंदिरात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दानपेटी चोरी : दोन लाखापेक्षा जास्त ऐवज चोरी

धुपखेडयाच्या साई मंदिरात सोन्या-चांदीच्या दागिन्यासह दानपेटी चोरली! 

sakal_logo
By
गणेश सोनवणे

बिडकीन (औरंगाबाद) : औरंगाबाद-पैठण रोडवरील प्रसिध्द देवस्थान असलेले धुपखेडा येथील श्री. साई बाबांच्या मंदिरात सोमवारी (ता.२३) पहाटे दोन वाजेच्या सुमारास तीन चोरट्यानी दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


धुपखेडा साई मंदिर येथील विश्वस्त समिती व गावकरी बांधवांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुपखेडा गावातील काही भाविक सकाळीच साई मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिराचे कुलूप तुटलेल्या असवस्थेत दिसले. मंदिरात प्रवेश करून पाहताच साईबाबांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट त्यांना दिसला नाही. दोन दानपेटीसुद्धा दिसल्या नाही. मंदिरात असलेल्या कपाटामधून सोन्या चांदीचे दागिने सुद्धा चोरट्याने कपाटाच्या आतील लॉकर मधून लंपास केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


साई मंदिराच्या विश्वस्त मंडळाने चोरी झालेल्या घटनेची माहिती बिडकीन पोलीस ठाणेला कळविली. बिडकीन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे दोन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. मात्र चोरट्यानी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने पोलीस ओळखू शकले नाही. घटनास्थळी पैठण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांनी भेट दिली. सदर ठिकाणी तात्काळ श्वान पथक बोलावून चोरट्यांचा मार्ग शोधण्याचे काम सुरू आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दानपेटी सापडली काही अंतरावर 
एक दानपेटी फुटलेल्या अवस्थेत मंदिराच्या काही अंतरावर सापडली. एक दानपेटी चोरट्यांनी सोबत घेऊन गेले. अशा चोरीच्या घटना पैठण तालुक्यातील अनेक गावात घडत असून नागरिकांकडून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image