
नगर आणि औरंगाबादसह विविध जिल्ह्यांमध्ये वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
बीड : नगर आणि औरंगाबादसह विविध जिल्ह्यांमध्ये वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या ताब्यातून अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. नितीन अंकुश शिंदे (रा. राजापूर) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून त्याने तीन महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर चोरुन आणले होते. शिवाय औरंगाबादेतून एक दुचाकीही चोरली होती.
चोरीची वाहने तो वापरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांना मिळाली होती. त्यावरुन सहायक पोलिस निरीक्षक विजय गोसावी, पोलिस नायक विकास वाघमारे, प्रसाद कदम, राहुल शिंदे, अशोक दुबाले, अतुल हराळे यांनी शनिवारी राजापूर येथे त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तलवाडा पोलिस करित आहेत.
संपादन - गणेश पिटेकर