
कळमनुरीत कृषी बाजारातून चोरट्यांनी पळविले ४० हजार, घटनास्थळी पोलिस दाखल
कळमनुरी (जि.हिंगोली) : हिंगोली- कळमनुरी मार्गावर कळमनुरी तालुक्यातील उमरा पाटी जवळ गजानन कृषी बाजार येथे मंगळवारी (ता.आठ) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सहा ते सात जणांनी सुरक्षारक्षकाला रॉडचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत ४० हजार रुपये पळविल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी (Kalamnuri) मार्गावर उमरा पाटीजवळ हिंगोली (Hingoli) येथील हेडा बंधू यांचा गजानन कृषी बाजार आहे. येथे शेतमालाची खरेदी विक्री केली जाते. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन सुरक्षारक्षक जागे होते.
हेही वाचा: आईच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने हृदयविकाराने लेकीचा मृत्यू
यावेळी तेथे सहा ते सात जण हातात लोखंडी रॉड घेऊन आले. त्यापैकी दोघे जण दोघे सुरक्षा रक्षकाजवळ रॉड घेऊन थांबले. त्यांना आवाज करायचा नाही केला तर जिवे मारुन टाकु, अशी धमकी देऊन इतरांनी जण केबीनमध्ये तोडफोड करून तेथे असलेले ४० हजार रुपये घेऊन पोबारा केला. चोरटे पळताना त्यांची सुरक्षारक्षकासोबत झटापट झाली. त्यांनी एका सुरक्षारक्षकाचा मोबाईल सोबत नेला.
हेही वाचा: जेवण व्यवस्थित करत नसल्याचा राग अनावर, मुलाने घेतला वडिलांचा जीव
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख , स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय , कळमनुरीचे निरीक्षक सुनील निकाळजे,गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पोलिसांची पथके रवाना केली आहेत. चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.
Web Title: Thieves Stolen 40 Thousand From Agriculture Market In Kalamnuri Of Hingoli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..