इम्पॅक्ट : तृतीयपंथीयांना मिळणार रेशन कार्ड 

महेश गायकवाड
शुक्रवार, 22 मे 2020

टाळी हेच जीवन असलेल्या तृतीयपंथीयांची लॉकडाउनमुळे टाळी थांबल्याने त्यांची रोजी रोटीही थांबली आहे. लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ झाल्याने त्यांचे पुन्हा हाल सुरु झाले. याबाबत `सकाळ`ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने दखल घेतली आहे.

जालना -  टाळी हेच जीवन असलेल्या तृतीयपंथीयांची लॉकडाउनमुळे टाळी थांबल्याने त्यांची रोजी रोटीही थांबली आहे. लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ झाल्याने त्यांचे पुन्हा हाल सुरु झाले. याबाबत `सकाळ`ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने दखल घेतली आहे. लवकरच जालन्यातील या तृतीयपंथीयांना लवकरच रेशन कार्ड देण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये यांनी सांगितले आहे. 

कोरोनाच्या संकटात गरीब, कष्टकरी, मजूर वर्गाबरोबर उपेक्षित घटकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात या घटकांना अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, सेवा भावी संस्था, दानशूर व्यक्तींनी आधार दिला. तृतीयपंथी समाजातील व्यक्तींवरही लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली होती. मात्र, शहरातील सामाजिक कार्यकर्ते व दानशूरांनी त्यांना मदतीचा हात दिला.

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

टाळेबंदीचा कालावधी वाढत असल्याने आणि समाजाकडून मिळणारी अन्नधान्याची मदत कमी झाल्याने पुन्हा त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. 
त्यामुळे त्यांना नाइलाजाने घराबाहेर पडून टाळी सुरू करावी लागली.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

गेल्या चार-पाच दिवसांपासून शहराबाहेरील चौकात सायंकाळी उभे राहून ही मंडळी आपली पोटा-पाण्याची सोय करत होती. याबाबत सकाळच्या बातमीची जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये यांनी दखल घेतली. शहरातील सर्व तृतीयपंथीयांना रेशन कार्ड देण्यात येणार असून त्यांची यादी जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

आमच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नाही. त्यामुळे आम्हांला कोणत्याही शासकीय सुविधा मिळत नव्हत्या. सकाळने आमच्या व्यथा मांडल्यामुळे अनेक वर्षांनंतर आम्हांला रेशनकार्ड मिळणार आहे. त्याबद्दल जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी व सकाळचे आम्ही आभारी आहोत. 
- अक्षरा ताडगे, तृतीयपंथी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third gender persons will get ration card

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: