
माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथे उसाच्या शेतावर असलेल्या विद्युत वाहक तार अचानक तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. या आगीमध्ये तीस एकर ऊस जळाला आहे.
माजलगाव (जि.बीड) : माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथे उसाच्या शेतावर असलेल्या विद्युत वाहक तार अचानक तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. या आगीमध्ये तीस एकर ऊस जळाला आहे. माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब आल्याने तात्काळ आग आटोक्यात आली आहे. कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची घटना बुधवारी (ता.नऊ) दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली आहे.
तालुक्यातील खरात आडगाव येथील शेतकरी भारत शेजूळ, चंद्रकला शेजुळ, दत्ता शेजुळ, लहु शेजुळ, बाळासाहेब शेजुळ, बाळासाहेब गोरे, गणेश शेजुळ, हरिभाऊ शेजुळ, छत्रभुज शेजूळ, धोंडीराम शेजूळ, वचिष्ठ शेजुळ, नामदेव शेजुळ, तुकाराम शेजुळ या शेतक-यांच्या शेतातुन विज वाहक तारा गेलेल्या आहेत. बुधवारी दुपारी अचानक विज वाहक तार तुटल्याने उसाला लागलेल्या आगीत तीस एकर उस जळाला असुन लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान माजलगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंद आल्याने तात्काळ ही आग आटोक्यात आली. या घटनेत कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
संपादन - गणेश पिटेकर