असा वाढतोय मोबाईलचा धोका 

File photo
File photo

नांदेड : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात जीवनशैली बदलत चालली आहे. मोबाईल, जंक फूड तसेच आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लहान वयात विविध आजाराला निमंत्रण मिळत आहे. मुलांमध्ये मानसिक विकार जडत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. 

आरोग्याला घातक

गेल्या काही वर्षांत लहान मुलांपासून ते तरुण, ज्येष्ठांपर्यंत बदलत्या जीवनशैलीचा परिणाम समोर येऊ लागला आहे. पूर्वी याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या बाबत आता गांभिर्यपूर्वक विचार करण्याची वेळ आली आहे. पूर्वी एकत्रित कुटुंबपद्धती होती; पण आता कौटुंबिक रचना बदलल्याने विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. पती आणि पत्नी दोघेही नोकरी किंवा उद्योग, व्यवसायात असल्यामुळे लहानपणापासून मुलांना जंक फूडची सवय लागली आहे. त्यातच दुर्देवाने मोठ्यांनाही आकर्षण निर्माण झाले आहे. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. बाहेर खाण्याचे प्रमाण वाढत असून ते आरोग्याला घातक ठरत आहे.

मोबाईलदेखील शाप की वरदान?

मोबाईलदेखील शाप की वरदान? अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे रूपातंर आता हळूहळू व्यसनाकडे होऊ लागले आहे. त्यामुळे आता मोठ्यांना स्वतःला बदलावे लागणार आहे. पालकांनादेखील मोबाईलचा योग्य वापर करावा लागणार आहे. मुलांमध्ये मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांच्यात स्थूलपणा, पचनसंस्थेचे आजार, चिडचिडेपणा, नैराश्य, अस्वस्थपणा, निरुत्साह वाढीस लागला आहे. त्यामुळे आता पालक त्रस्त झाले असून यावर काय उपाययोजना कराव्यात? या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

आम्ही वरण, भात, भाजी, पोळी खातो, असे अभिमानाने सांगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मोबाईल सहजगत्या उपलब्ध होत असल्यामुळे त्याचे व्यसन जडत आहे. मोबाईल संपर्काचे साधन असून ते अत्यावश्यक गोष्टीत मोडत असले तरी आपण त्याकडे चैनीच्या गोष्टी म्हणून बघत असला तर व्यसनाच्या गर्तेत सापडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मोबाईलचा वेळीच मोह टाळून मैदानी खेळांवर तसेच पुस्तक वाचन संस्कृतीवर भर देण्याची गरज आहे.  
- डॉ. संदीप देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ.
 
मोबाईल, टॅब, टीव्ही व इतर इलेक्ट्रानिक गॅझेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये अतिचंचलता, जिद्दी व हट्टीपणा वाढला आहे. तसेच राग, चिडचिडेपणा, इतरांना मारणे, वस्तू फेकणे किंवा तोडणे, एक्कलकोंडेपणा, असे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे पुढे अभ्यासात लक्ष न लागणे किंवा विचलीत होणे, लक्षात राहण्यास अडचणी येणे, असे दूरगामी परिणाम होतात. टच स्क्रीनच्या वापरामुळे बोटांच्या स्नायूंचा विकास खुंटतो. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळावा.  
- अमोल निंबाळकर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com