Dharashiv : फायनान्सच्या जाचाला कंटाळून ढोकीत जीवन संपवले

बालाजी वाकुरे यांनी चोला मंडल फायनान्स शाखा लातूर यांच्याकडून एक ट्रक घेण्यासाठी कर्ज घेतले होते.
Crime
Crimesakal

ढोकी : लातूर येथील चोला मंडल फायनान्सद्वारे एक ट्रक घेतली होती. फक्त दोनच हफ्ते थकल्यामुळे त्यांनी घरी येऊन तगादा लावून गाडी ओढून नेली. त्यामुळे ढोकीत एकाने आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (ता.४) घडली. बालाजी सुभाष वाकुरे (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

बालाजी वाकुरे यांनी चोला मंडल फायनान्स शाखा लातूर यांच्याकडून एक ट्रक घेण्यासाठी कर्ज घेतले होते.

Crime
Dharashiv Crime News : दोन घरफोड्या; दहा लाखांचा मुद्देमाल चोरीला

तिचे दोन हप्ते थकल्यामुळे कंपनीने सतत पैशाचा तगादा लावला.त्यानंतर फायनान्सवाल्यांनी ट्रक ओढून नेली, या नैराश्यातून त्यांनी स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, अशी फिर्याद ढोकी पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.

या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ सातपुते हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com