esakal | ट्रकच्या धडकेत शेतकऱ्यासह तीन म्हशी ठार, बीडच्या मांजरसुंब्यातील घटना!  
sakal

बोलून बातमी शोधा

accident.jpg
  • मांजरसुंबा जवळील घटना 
  • संतप्त नागरिकांचा महामार्गवर रास्ता रोको 

ट्रकच्या धडकेत शेतकऱ्यासह तीन म्हशी ठार, बीडच्या मांजरसुंब्यातील घटना!  

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : ट्रकने जोरदार धडक दिल्याने शेतकऱ्यासह तीन म्हशी ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. २१) सकाळी तालुक्यातील मांजरसुंबा जवळील शिवाजी नगर वस्तीजवळ घडली. भानुदास वाघिरे (वय ५५) असे अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तासभर रस्ता रोको करत या अपघाताला वाहतूक पोलिस याला जबाबदार असल्याचा आरोप केला. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालुक्यातील मांजरसुंबा जवळील उदंडवडगाव - शिवाजीनगर येथील भानुदास वाघिरे शनिवारी सकाळी आपल्या म्हशी घेऊन शेताकडे निघाले होते. रस्त्याने जात असताना सोलापूरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. आर. जे. ४० जी. बी. ३९४५) वाघीरे आणि त्यांच्या सोबतच्या म्हशींना जोराची धडक दिली. या अपघातात भानुदास वाघिरे हे जागीच ठार झाले तर ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने एक म्हैसही जागीच मृत्यूमुखी पडली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन म्हशीही काही वेळाने ठार झाल्या. घटनेनंतर नागरिकांनी महामार्ग पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त केला. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकही वाहन जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पीएसआय विलास जाधव, पोलिस कर्मचारी श्री. ढाकणे, श्री. राठोड, श्री. वाघमारे, श्री. राऊत, अमोल नवले, श्री. घुले, श्री. चव्हाण आदींनी धाव घेतली. संतप्त जमावास त्यांनी शांत केले. त्यानंतर सदरचा महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला झाला. 

(संपादन-प्रताप अवचार)