esakal | परभणीत तीन मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता.दोन) उपचार सुरु असताना तीन जणांचा मृत्यू झाला तर ४६ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. 

परभणीत तीन मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.दोन) उपचार सुरु असताना तीन जणांचा मृत्यू झाला तर ४६ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये एक महिला, दोन पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या पाच हजार ५१५ झाली आहे. तर एकूण मृत्यु २३४ झाले आहेत. 

पूर्णेत पंधरा पॉझिटिव्ह 
पूर्णा तालुक्यात पंधरा जण कोरोना बाधित आढळले. त्यात महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या सात मजूरांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयांतर्गत शुक्रवारी (ता.दोन) एकूण ४२ संशयितांची रॅपिड ॲंटीजेन किट द्वारे तपासणी करण्यात आली असून त्यात १५ कोरोना बाधित आढळले. आज प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ग्रामीण भागात संशयितांची रॅपिड ॲंटीजेन तपासणी करण्यात आली नाही. 

हेही वाचा - Video- सुट देऊन लुट करणे खादीच्या तत्वात बसत नाही : किनगावकर

सेलूत तीन पॉझिटिव्ह 
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या गुरुवारी (ता.एक) सायंकाळी संपर्कात आलेल्यांमध्ये तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या बाधित रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. संजय हरबडे यांनी दिली. सेलू शहरात दोन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. गुरुवारी (ता.एक) रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये तीन जण पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर सायंकाळी उशिरा तीन जण बाधितांच्या संपर्कातील पॉझिटिव्ह आढळून आले. यात लोकमंगल नगरातील ४० वर्षीय पुरुष, मारोती नगरातील १२ वर्षीय मुलगी व तालुक्यातील बोरकीनी येथील ५५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण १८ जणांवर डॉ. नितीन गोलाइत, डॉ. गिरीश महाजन हे उपचार करत असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे यांनी दिली. 

हेही वाचा - हिंगोली : कोंढूर येथील 75 एकर गायरानात फिरविला जेसीबी, अतिक्रमण उद्धवस्त

सेलूत ५२ महिलांची तपासणी 
उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महिलांसाठी शुक्रवारी (ता.दोन) साई नाट्यगृहात रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली. या वेळी ५२ महिलांची तपासणी केली असता सर्व महिलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली. यासाठी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. संजय हरबडे व महिला मंडळ सेलू यांच्या नियोजनाखाली डॉ. सोनाली जाधव, डॉ.गुलनाझ शेख, शंकर अंकुलवार, यु.बी. पारवेकर, राधाकिशन मगर, श्रीमती सविता गौळ, रेणुका काटमकर, शिल्पा देशमुख, शिल्पा पाजगे, किरण कोकाटे, उद्धव राऊत, रामा ढेंगळे, राजकुमार सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. 
 
शुक्रवारी (ता.दोन) रात्री सात पर्यंतची आकडेवारी

परभणी जिल्हा  
एकूण बाधित - पाच हजार ५१५
आजचे बाधित - ४६
आजचे मृत्यु - तीन
एकूण बरे - चार हजार ६९३
उपचार सुरु असलेले - ५८८
एकूण मृत्यु - २३४

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image