कांदा घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने अपघात, बीड जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

Tempo Accident
Tempo Accident

नेकनूर (जि.बीड) : कांदा घेऊन निघालेल्या टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो दुभाजकावर जोरात धडकला. या अपघातात चालकासह तीन ठार, तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.१६) पहाटे दोन वाजता तुळजापूरच्या घाटात घडली. या दुर्दैवी घटनेने नेकनूरसह निवडूंगवाडीवर शोककळा पसरली आहे. नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या निवडूंगवाडी आणि नेकनूर येथील गवळवाडी येथील तीन शेतकऱ्यांनी आपला कांदा एकत्रित करून तो सोलापूरच्या बाजाराला टेम्पो (एमएच १६ एई ७७०४) यामध्ये घेऊन जात होते.

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो तुळजापूरच्या घाटात दुभाजकावर जोरात धडकला. यात चालक शेख सज्जाद सकलेन (वय ४०, रा. नेकनूर), देवराव तुळशीराम शिंदे (वय ५५ रा.गवळवाडी नेकनूर), मोहन भगवान मुंडे (वय ४५, रा.निवडूंगवाडी) हे तिघे ठार झाले तर भागवत शिवाजी मुंडे (वय ४०, रा. निवडूंगवाडी) हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती नेकनूर आणि निवडूंगवाडी येथील नागरिकांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दुर्दैवी घटनेने नेकनूर, निवडूंगवाडी, गवळवाडी येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान मृत चालक नेकनूर येथील असून आपल्या मनमिळावू स्वाभाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे नेकनूर येथील व्यापाऱ्‍यांनी बंद ठेवून दुख व्यक्त केले.
 

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com