बीडमध्ये भामट्यांनी पोलिसालाच घातला गंडा!

दत्ता देशमुख
Wednesday, 18 November 2020

ऑनलाइन अॅपवरून दिलेल्या लिंकद्वारे सामान्यांची फसवणूक नवी नाही. मात्र, तीन भामट्यांनी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून ४९ हजार रुपये लांबविल्याची घटना मंगळवारी (ता. १७) उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

बीड : ऑनलाइन अॅपवरून दिलेल्या लिंकद्वारे सामान्यांची फसवणूक नवी नाही. मात्र, तीन भामट्यांनी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून ४९ हजार रुपये लांबविल्याची घटना मंगळवारी (ता. १७) उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सूर्यकांत आत्माराम शिंदे हे जिल्हा कारागृहात नोकरीला आहेत. ११ नोव्हेंबर रोजी त्यांनी ऑनलाईन अॅपद्वारे काही वस्तूंची खरेदी केली होती. त्यानंतर काही वेळाने त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. या लिंकला क्लिक करुन ऑनलाइन पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. लागोपाठ तीन वेगवेगळ्या मोबाइलवरून कॉल आले.
डेबिटकार्ड व ओटीपी क्रमांक मागविण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सुर्यकांत शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन तो त्यांना दिला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या खात्यातून ४९ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. त्यांनी तिन्ही क्रमांकावर पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे तपास करत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three people cheated police online