'जालन्यात प्रतिव्यक्ती तीन झाडे लावली जाणार', जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

'जालन्यात प्रतिव्यक्ती तीन झाडे लावली जाणार', जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

जालना: पुढील महिन्यात जागतिक पर्यावरण दिनापासून जिल्हाभरात वृक्षलागवडीचा उपक्रम (plantation in jalna) घेण्यात येणार आहे. प्रतिव्यक्ती तीन झाडे लावण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात वृक्ष वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवडीचे ग्रामपंचायतनिहाय सूक्ष्म नियोजन करून आराखडे तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी (ता.११) दिले आहेत (jalna latest news).

वृक्ष लागवड मोहीम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, सहायक वनसंरक्षक वन विभाग पी.पी.पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. मोहिते यांच्यासह रोटरी क्लब ऑफ जालना रेन्बोचे सदस्य, अशासकीय संस्थेचे सदस्य आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: Corona Vaccination: कळंबमध्ये लसीकरणासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी

जिल्ह्यात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड मोहिमेचा प्रारंभ होईल. यात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका व शहरी भागात वृक्ष लागवड केली जाणार आहे. रोपांच्या उपलब्धतेबाबत वन विभाग व सामाजिक वनीकरण यांनी नियोजन करून आवश्यकतेप्रमाणे रोपे उपलब्ध करून द्यावीत.

हेही वाचा: औरंगाबादेत आता फक्त दुसरा डोस!

वृक्षलागवडीचे काम येत्या पावसाळ्यात करावयाचे असल्यामुळे गावातील, शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत, शेतामध्ये, बांधावर, पडीक जमिनीवर, रस्ता दुतर्फा, कालव्याच्या दुतर्फा, नदी व नाले यांच्या काठावर वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेऊन गावातील व शहरातील प्रत्येक व्यक्तीमागे किमान तीन झाडे लावण्याकरिता नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Three Trees Will Be Planted Per Person In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :plantation
go to top