तिबेटीयन स्वेटरची अशी ही नवलाई : Video

sweter
sweter

नांदेड : यंदा हवामानातील बदलाच्या परिणामाने अनेकांना दिवाळीत थंडी जाणवलीच नाही. दाेन दिवसांपासून हवेत निर्माण झालेल्या गारव्याने गुलाबी थंडी अंगाला झोंबु लागली आणि नांदेडकरांची पावले अनेक दिवसांपासून दुकाने थाटुन ग्राहकांच्या प्रतिक्षेत असलेल्या तिबेटीयन स्वेटर मार्केटकडे वळली.

राज्यात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तिन्ही ऋतु एका पाठोपाठ येतात. यामुळे दर चार महिण्याच्या अंतराने ऋतु बदल होतो आणि त्या-त्या ऋतुमध्ये वापरण्यासाठी घडी करून ठेवलेल्या कपड्यांची अनेकांना आठवण होते. तर काही जण बदलत्या फॅशनट्रेंड नुसार हिवाळ्यात वापरण्यासाठी नवीन फॅशनेबल गरम कपड्यांच्या शोधात असतात. त्यांचा हा शोध तिबेटीयन स्वेटर मार्केटमध्ये आल्यावर संपतो. आणि मनासारखे अगदी नवीन ट्रेंडनुसार त्यांना हवे तसे गरम कपडे मिळतात.

नांदेडकरांना देखिल मागील काही वर्षापासून तिबेटीयन स्वेटर मार्केटच्या फॅशनेबल गरम कपड्यांची सवय जडली आहे. पूर्वी शहराची लोकसंख्या कमी होती. तेव्हा तिबेटीयन स्वेटर मार्केट जुना मोंढा येथे लागत असे, त्यानंतर हिंगोली गेट परिसर आणि अगदी काही वर्षापासून कलामंदिर परिसरातील मोकळ्या जागेत टिबेटीयन वाशियांनी आपले बस्तान बसविले आहे.

तसे बघता निकच्या फुटपाथ वरील व्यावसायिक व दुकानदारांचा सामना करावा लागतो. परंतिबेटीयन स्वेटर मार्केटला स्थातु, गुणवत्तापूर्ण आणि खात्रिलायक गरम कपडे म्हणून परिचित असलेल्या या मार्केटमध्ये ग्राहकांना कपडे खरेदी करण्यासाठी मनधरणी करावी लागत नाही. त्यामुळे इथे गरम कपड्यांच्या सुद्धा एकच भाव असतो. तो कधीच कमी दराने विकला जात नाही. हेच या स्वेटर मार्केटचे वेगळेपण आहे.

अशी आहे विशेषता

दरवर्षी युवा पिढीचा फॅशन कल बघुन त्यानुसार गरम कपडे तयार केली जातात. सध्या ‘स्वेट शर्ट’ जॅकेट, महिला आणि मुलींसाठी श्रग, कॅप विथ मफलर यांना चांगली मागणी आहे. थंडीपासून बचाव करणाऱ्या स्वेटर, मफलर, रजई, दुलई, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी, जॅकेट, लहान मुलांचे स्वेटर, कानटोपरे, हातमोजे, महिलांचे स्वटेर व शाल या कपडय़ांना चांगली मागणी आहे. काश्मिरी शाली व स्वटेरसुद्धा विक्रीला आहेत.

खास लेडीज कोटी नावाचे स्वेटर्स

महिलांसाठी यावर्षी खास लेडीज कोटी नावाचे स्वेटर्स बाजारात आले आहे. त्यातही अनेक प्रकार आहेत. हाताने विणलेल्या स्वेटरला चांगली मागणी आहे. जॅकेट ४०० रूपयांपासून पाच हजार रूपयापर्यंत तर महिलांचे स्वेटर २०० पासून १२०० रुपयापर्यंत विक्रीला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com