देऊ नका मृत्यूला आमंत्रण ! 

file photo
file photo

औरंगाबाद - अमली पदार्थांचा काळाबाजार सातत्याने होत आला आहे. हेरॉईन, कोकेन आदी महागड्या अमली पदार्थांसोबतच काही बंदी आणण्यात आलेल्या ड्रग्जची तस्करीही देश-विदेशांतून सुरू आहे. या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते; परंतु या पदार्थांचे व्यसन जडलेले असंख्य नागरिक व त्यांची कुटुंबे उद्धवस्त होत आहेत. अनेकजण निरनिराळ्या रोगांनी ग्रस्त असून मृत्यूही ओढवले आहेत. 

व्यसनाधीनतेमुळे असंख्य संसार मोडले गेले. कौटुंबिक कलह, समस्या व गरिबीत आणखीनच भर पडून आत्महत्यांचेही प्रकार घडत आहेत. मद्यपान, अमली पदार्थांचे व्यसन देशातील युवा पिढीला व त्यांच्या उज्ज्वल भविष्याला ग्रहण लावीत आहे. कोकेन, चरससारख्या अमली पदार्थांची शहरात तस्करी होत नसली तरीही छुप्या पद्धतीने एखाददुसरी व्यक्ती शहरात अशा पदार्थांची विक्री करते. ही बाब गतवर्षी झालेल्या कारवाईवरून समोर आली आहे. 

का होते नशेखोरीची लागण 

  • मूल्यशिक्षण व उच्च दर्जाच्या शिक्षणाचा अभाव. 
  • भोवतालचे पोषक नसलेले सामाजिक वातावरण. 
  • शिक्षणात अपयश, गरिबी, बेरोजगारी. 
  • विकास व प्रगत समाजजीवनापासून वंचितपण 
  • शासन व त्यांच्या योजना अशा कुटुंबांपर्यंत न पोचणे. 
  • चैन, विलासी बदलत्या जीवनपद्धतीचा अंगीकार. 
  • झटपट पैशांसाठी प्रयत्न, अपेक्षाभंग, नैराश्‍य. 
  • बालपणी मनावर झालेला आघात, परिस्थिती. 

हे आहेत अमली पदार्थ 

कोकेन, मेथाएम्फेटामिन, रिटालिन, साइलर्ट, इन्हेलंट, हेरॉईन, मॉर्फिन, गांजा, अफू, मद्य यासह विविध नशा व गुंगीकारक ड्रग्ज. शिवाय विविध प्रकारची मद्ये, हातभट्टी, गावठी दारू, ताडी, भांग यांचाही नशाकारक पदार्थांमध्ये समावेश होतो. 

एका रिपोर्टनुसार देशातील स्थिती 

  • देशात 16 कोटी व्यक्ती मद्यसेवन करतात. 
  • 10 ते 75 वयोगटातील 14.6 टक्के व्यक्ती मद्यपान करतात. 
  • 27.3 पुरुष व 1.6 टक्के महिला व 1.3 टक्के मुले मद्यपान करतात. 
  • 30 टक्के देशी व 30 टक्के विदेशी मद्यपानाचे प्रमाण. 
  • उर्वरित 40 टक्के याशिवाय स्थानिक पातळीवर विविध प्रकारची मद्ये व अमली पदार्थांचे सेवन. 
  • इंजेक्‍शनद्वारे महाराष्ट्रात 44 हजार 323 व्यक्ती ड्रग्ज घेतात. 
  • देशात हेच प्रमाण आठ लाख 54 हजार 296 एवढे आहे. 
  • महाराष्ट्रात 10.2 टक्के व्यक्ती मद्यपान करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com