तिरंगा रॅलीने वेधले लातूरकरांचे लक्ष

latur
latur

लातूर : मराठवाड्यातील सर्वात उंच 150 फुटाचा राष्ट्रध्वज येथे उभारला जात आहे. शुक्रवारी (ता. 18) सांस्कृतिकमंत्र विनोद तावडे व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. या  निमित्ताने नागरीकात राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी या उद्देशाने या राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, या करीता गुरुवारी (ता. 17) शहरातून तिरंगा मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीने लातूरकरांचे लक्ष वेधले. हातात तिरंगा ध्वज घेवून तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

या तिरंगा रॅलीला येथील नवीन रेणापूर  नाका येथून सकाळी सुरवात झाली. ही रॅली शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई, शाहू चौक, विवेकानंद चौक, गुळ मार्केट, बसवेश्वर चौक, कन्हेरी चौक, मिनी मार्केट, उड्डाण पूल , अष्टविनायक रोड, नारायणनगर, नाईक चौक, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक मार्केत पीव्हीआर चौकात या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. यात उपमहापौर देवदास काळे, स्थायी समितीचे सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे, शैलेश लाहोटी आदी सहभागी झाले होते.

या रॅलीत भारतमातेच्या वेशभुषा करून  तरुणी सहभागी झाल्या होत्या. रॅलीच्या सुरवातील अनेक तरुणी मोटार सायकलवर हातात राष्ट्रध्वज घेवून सहभागी होत्या. त्यानंतर शेकडो तरुण यात सहभागी झाले होते. या रॅलीने लातूरकरांचे लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com