Maratha Reservation Manoj Jarange Patil
Maratha Reservation Manoj Jarange Patilesakal

'सांडलेल्या रक्ताचा बदला आरक्षण घेऊन पूर्ण केला'; अंतरवाली सराटीत पोहोचताच मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

जरांगे यांचे गावात (Antarwali Sarati) आगमन होताच फटाके, रोषणाई आणि ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.

-दिलीप दखणे

अंतरवाली सराटी : '‘मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा सोपा नव्हता. समाज बांधवांच्या मदतीने तो यशस्वी झाला’’, अशी भावना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी येथे रात्री १२ नंतर झालेल्या सभेत व्यक्त केली. जरांगेंसह मराठा आंदोलक शनिवारी (ता. २७) रात्री सव्वाअकराच्या सुमारास अंतरवाली सराटी येथे पोचले. यावेळी ग्रामस्थ, हजारो समाज बांधव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जरांगे यांची सभा झाली.

जरांगे यांचे गावात (Antarwali Sarati) आगमन होताच फटाके, रोषणाई आणि ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. महिलांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून औक्षण केले. सभेत जरांगे म्हणाले, ‘‘आरक्षणाचा मोठा इतिहास आहे. सगेसोयरेसाठी दोन महिने गेले. टाळाटाळ होत होती. कायदा लहान नाही. व्याख्या मोठी आहे. नोंद मिळाली. आरक्षण मिळणार आहे,’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Maratha Reservation Manoj Jarange Patil
संजय राऊत-रोहित पवारांनी उभा केलेला स्टंट.. मराठा आरक्षणाच्या विजयावर सदावर्तेंची टीका

आज दुपारी बैठक

आता पुढील दिशा काय असेल, हे ठरवण्यासाठी आज, रविवारी (ता. २८) दुपारी १२ वाजता बैठक घेणार आहे. पुढे काय करायचे याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे. राज्यातील मराठा बांधवाचा (Maratha Community) हा विजय आहे. सांडलेल्या रक्ताचा बदला आरक्षण घेऊन पूर्ण केला. लोकांनी मोठा त्रास सहन केला’’, असेही जरांगे म्हणाले.

'संघर्ष योद्ध्यावर आम्ही जीवदेखील ओवाळून टाकू'

मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी अंतरवाली सराटी येथे ग्रामस्थांनी सकाळपासूनच तयारी केली होती. रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवे पताके, भगवे झेंडे घेऊन समाजबांधव उभे होते. जरांगे अंतरवालीत येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांना पेढे भरवण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या या संघर्ष योद्ध्यावर आम्ही जीवदेखील ओवाळून टाकू, अशा शब्दांत समाज बांधवांनी भावना व्यक्त केल्या.

Maratha Reservation Manoj Jarange Patil
Maratha Reservation Case : मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर हरकती नोंदवा; छगन भुजबळ यांचे आवाहन

काकासाहेब शिंदे यांना अभिवादन

कायगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रात्री आठ वाजता अंतरवाली सराटी येथे जाताना कायगाव येथे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी नवीन कायगाव येथे मराठा समाज बांधवांनी जरांगे यांना थांबवून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. राजेंद्र इष्टके, शिवाजी मिसाळ, योगेश आवारे, राहुल देवरे, सागर भोगे, ओंमकार कळसकर, किरण वायसळ, प्रकाश निरपळ, मुकुंद देवकर, आकाश वायसळ, वैभव इष्टके, अंबादास गायकवाड, रुस्तुम म्हस्के, रामचंद्र बिरुटे, जयवंत जोशी, अमळनेर, कायगाव, लखमापूर, गणेशवाडी आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com