esakal | मराठवाड्यात सध्या २४ कोरोनाग्रस्त, आठ जिल्ह्यांत ५६७ संशयित
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

आठवड्याभरापूर्वी मराठवाड्यात केवळ औरंगाबादमध्ये एक महिला कोरोनाबाधित होती. उपचारानंतर ती बरीही झाली. दरम्यान, उस्मानाबाद, लातूर,हिंगोली आणि जालना येथेही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. औरंगाबादमध्येही रविवारी ७ रुग्ण  वाढले. शिवाय रविवारी एका बाधिताचा मृत्यू झाला. 

मराठवाड्यात सध्या २४ कोरोनाग्रस्त, आठ जिल्ह्यांत ५६७ संशयित

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाबाधितांची संख्या आता २४ वर पोचली आहे. यात औरंगाबादेत कोरोनाची लागण झालेली एक ५९ वर्षीय रुग्ण बरी होऊन घरी परतली आहे.

दरम्यान, रविवारी (ता. पाच) औरंगाबादेतील एका ५८ वर्षीय बँक मॅनेजरचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. सोमवारी (ता.६) जालना शहरात एक ज्येष्ठ महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

आठवड्याभरापूर्वी मराठवाड्यात केवळ औरंगाबादमध्ये एक महिला कोरोनाबाधित होती. उपचारानंतर ती बरीही झाली. दरम्यान, उस्मानाबाद, लातूर,हिंगोली आणि जालना येथेही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. औरंगाबादमध्येही रविवारी ७ रुग्ण  वाढले. शिवाय रविवारी एका बाधिताचा मृत्यू झाला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आतापर्यंत आठ जिल्ह्यातील एकूण एक हजार ६४ लोकांच्या स्वॅबचे नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी ८६८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. २७ नमुने मानकाप्रमाणे नसल्याने परत पाठवण्यात आले आहेत. 

विभागामध्ये सध्या १४ हजार ९४१ व्यक्तींना घरीच विलगीकरणात व ३४५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ५६७ व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचेही विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

९९ ठिकाणी क्वारंटाइन

मराठवाड्यात आठ हजार ३१४ बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विभागांमध्ये कोरोनासंदर्भात एक हजार ९२ खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र १६ समर्पित रुग्णालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये एक हजार ३०० खाटांची सुविधा आहे.

१३ हजार प्लेटलेट बॅग उपलब्ध

विभागातील रक्तपेढीमध्ये आजघडीला ७९७ होल ब्लड, आठ हजार ७८८ पीसीव्ही, १३ हजार ७१८ प्लाझ्मा (एफएफपी) व २६२ प्लेटलेट बॅग उपलब्ध आहेत. रक्तसाठा व इतर संकलन वाढवण्यासाठी जिल्ह्यातील रक्तदात्यांना आव्हनाचे निर्देशन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

विभागात फक्त १५६ व्हेंटिलेटर

विभागात १५६ व्हेंटिलेटर आणि दोन हजार ९८४ पीपीई किट आणि ३९ हजार ६२ एन-९५ मास्क उपलब्ध आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्यातली परिस्थिती

औरंगाबाद - ११
लातूर - ८
उस्मानाबाद - ३
हिंगोली - १
जालना - १
एकूण - २४

loading image