

Maharashtra Highway Pothole Accident Farmer Dies as Tractor Overturns Near Devgaon Rangari in Chhatrapati Sambhajinagar
esakal
-संतोष गंगवाल
देवगाव रंगारी :रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर-ट्रॉली शेतात उलटली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक युवा शेतकरी नाना रंगनाथ कापसे (वय ३९, रा. पोटुळ, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.