पर्यावरण दिनी जिंतुरात वृक्षलागवड

पर्यावरण दिनी जिंतुरात वृक्षलागवड
Summary

विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जिंतूर (परभणी) : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत वातावरणातील कार्बन डाइऑक्साइड, कार्बन मोनाॅक्साइड, मिथेन या वायूंचे प्रमाण पर्यावरण ही मानवासमोर किंबहुना जगासमोर ज्वलंत समस्या बनली असल्याचे कोरोनाच्या संकट काळात सर्वांना जाणवले असल्याने यावर्षीच्या पर्यावरण दिनाला विशेष महत्त्व दिसून आले. त्यानुषंगाने जिंतूर शहरात विविध शासकीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटना, पर्यावरण व वृक्षप्रेमींनी शनिवारी (ता.५) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षलागवड मोहीम (Tree planting campaign) राबवून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची शपथ घेतली. (Trees were planted in indoor on environment day)

पर्यावरण दिनी जिंतुरात वृक्षलागवड
"छत्रपतींंनी घालून दिलेल्या आदर्शानुसार महाराष्ट्र घडवूया"

त्यानुसार नगरपरिषदेतर्फे उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्या हस्ते येलदरी रोडवरील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक सालेह चाऊस व अन्य कर्मचाऱ्यांनीही झाडे लावली. ड्रीमलॅंड प्रोजेक्टच्या ज्ञानगिरी स्थळी ज्ञानोपासकचे वृक्षप्रेमी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी कांचन, सिसव, करंज, कडुलिंब या व इतर पन्नासपेक्षा जास्त झाडांची रोपे लावली. विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण दिनी जिंतुरात वृक्षलागवड
नांदेडकरांना मोठा दिलासा : आज सोळा रुग्ण कोरोनामुक्त

यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रामराव उबाळे संस्थेचे अध्यक्ष काझी आसेफोददीन सिद्दीकी. उपाध्यक्ष. वासेफोदीन सिद्दीकी आदिंसह उपस्थितांनीही विविध प्रकारची रोपे लावली.तर मैनापुरी देवस्थान परिसरातील झाड फाउंडेशनच्या झाडकऱ्यांनी शंभर झाडांची तूट भरून काढण्याची मोहीम सुरू केली असून योग परिवारातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. (Trees were planted in indoor on environment day)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com