Tribes Farmer : आदिवासी शेतकऱ्यांना मोहाचा मोह आवरेना; मोहाच्या फुले विक्रीतून रोजगार

सिल्लोड तालुक्यातील डोंगरपट्ट्यांमधील गावांमध्ये मोहाचे फुले वेचण्याची लगबग बघावयास मिळत आहे.
Moh Flower
Moh Flowersakal
Summary

सिल्लोड तालुक्यातील डोंगरपट्ट्यांमधील गावांमध्ये मोहाचे फुले वेचण्याची लगबग बघावयास मिळत आहे.

सिल्लोड - तालुक्यातील डोंगरपट्ट्यांमधील गावांमध्ये मोहाचे फुले वेचण्याची लगबग बघावयास मिळत आहे. येथील धावडासह परिसरातील गावांत मोठ्या प्रमाणात मोहाच्या फुलांचे उत्पन्न होते. या मोहाच्या झाडाला फुले येण्यास होळीपासून सुरुवात होते. आता फूलगळ होत असल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी वेचणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील बहुतांश आदिवासी कोळी बांधव, भगिनी मोहाचे फुले वेचून ते वाळवून विकतात. त्यामुळे त्यांना रोजगार व थोड्या बहोत प्रमाणात पैसा मिळतो. मोहाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदिवासींचे कल्पवृक्ष म्हणून यास संबोधले जाते. मोहाच्या फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. सिल्लोड तालुक्यात आदिवासी कोळी, मल्हार जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील घाटनांद्रा, धावडा, केळगाव, मुंबई हट्टी, उंडणगाव, जळकी, वसई, हळदा, डकला, आमसरी, वाघेरा गावांमध्ये मोहाची फुले वेचण्याचे काम सुरू आहे.

मोहाच्या फुलांना तालुक्यात खुली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. तसेच यावर संशोधन झाल्यास मोठ्या प्रमाणात आदिवासींना रोजगार मिळू शकतो. परंतु तसे होताना दिसत नाही. उलट मोहाचे फुलं रोजगाराचे साधन न बनता फक्त मद्यासाठी कुप्रसिद्ध झाले. शासनाने या आदिवासी कल्पवृक्षाला नवसंजीवनी देऊन व आधुनिकतेची झालर दिल्यास आदिवासींच्या आर्थिक सक्षमीकरणास मदत होईल.

सिल्लोड तालुक्यात आदिवासी कोळी मल्हार जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या मदतीने मोहाच्या फुलांपासून विविध पदार्थ कसे तयार करता येईल यासाठी खासगी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा व शासनाने खुली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.

- रीना संदीप इंगळे, ग्रामपंचायत सदस्य. धावडा

आमच्या शेतात आजोबांच्या काळापासून मोहाचे झाडे असल्याने आम्ही पिढ्यानपिढ्या सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत ०५ ते ०६ किलो मोहाचे फुले वेचतो व वाळवून विक्री करतो.

- दत्तू देवराव तायडे, आदिवासी शेतकरी, धावडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com