उपअधिक्षक पंडीत डोईफोडेंच्या आत्महत्येप्रकरणी 3 कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल

जगदीश कुलकर्णी
Tuesday, 5 January 2021

उपअधिक्षक पंडीत डोईफोडे यांच्या शेजारी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये श्री डोईफोडे यांनी कम॔चार्यांच्या त्रासामुळे आत्महत्या केली

तुळजापूर (जि.उस्मानाबाद):  भूमिअभिलेख खात्याचे उपअधिक्षक पंडीत तुकाराम डोईफोडे यांच्या आत्महत्येप्रकरणी तिघा कर्मचाऱ्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मंगळवारी (ता. 5) पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री. डोईफोडे हे मागील चार ते पाच वर्षापासून भूमिअभिलेख कार्यालयात उपअधिक्षक पदावर कामावर होते.

श्री डोईफोडे कार्यालयात नसताना त्यांच्या खोट्या सह्या करून फेर मंजूर करण्यात आले होते. श्री. डोईफोडे यांनी याप्रकरणी भूमिअभिलेख खात्याच्या कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणूक करणे तसेच खोटी कागदपत्रे तयार करणे याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदरचे गुन्हे यापूर्वी पोलीसांत नोंदीत करण्यात आले होते. श्री डोईफोडे यांना या प्रकरणातील संशयित आरोपींकडून धमक्यांचे तंत्र अवलंबिण्यात आले होते. रविवारी (ता.3) कार्यालयातील कम॔चारी एस.एस. ढोले यांनी श्री डोईफोडे यांना जीवेमारण्याची धमकीही दिली होती.

शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'

सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास श्री डोईफोडे यांनी बाटलीतील विष पिऊन एसटी कॉलनीतील राहत्या खोलीत आत्महत्या केली. यासंदर्भात मारूती तुकाराम डोईफोडे ( हल्ली मुक्काम अचलेर तालुका लोहारा) राहणार माळाकोल्हारी तालुका किनवट  यांनी यासंदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपअधिक्षक पंडीत डोईफोडे यांच्या शेजारी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये श्री डोईफोडे यांनी कम॔चार्यांच्या त्रासामुळे आत्महत्या केली.

दहा ग्रामपंचायती बिनविरोध; राजकारणाचे केंद्र असलेली मुळज ग्रामपंचायत बिनविरोध

कर्मचारी ए.ए. माळी, एस.एस. ढोले, ए.एन. सूर्यवंशी यांच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार गणपत राठोड तपास करीत आहेत. दरम्यान उपअधिक्षक श्री डोईफोडे यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांचे पार्थिव माळकोल्हारी तालुका किनवट येथे सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पाठविण्यात आले. उपअधिक्षक श्री डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuljapur crime news 3 employees charged killed himself Pandit Doifode