तुळजापूर : पाच वर्षीय मुलाचा अल्पवयीन मुलाकडूनच खून

याबाबत पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरवात केलेली आहे.
Murder
MurderSakal

तुळजापूर : तालुक्यातील सांगवी मारडी येथे पाच वर्षीय मुलाचा खून (Murder) केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी (Police) तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरवात केलेली आहे.

पोलीसांनी सांगितले की, मृत मुलाचे नाव ओम मनोज बागल (वय 5) असे आहे. ओम मनोज बागल (वय 5) याचे वडील मनोज बागल हे शेती आणि ड्रायव्हिंग करतात. गुरूवारी ता.16 मनोज बागल हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घराकडे आले त्यावेळी ओम याने वडिलांना चाॅकलेट साठी पैसे मागितले. मनोज बागल यांनी ओम यांस दहा रूपये दिले. ओम चाॅकलेट आणण्यासाठी गेला तो परत आलाच नाही. ओम याचे वडील गावातील दुकानदार जरासंध बागल यांच्याकडे आमचा मुलगा ओम दुकानात चाॅकलेट घेण्यासाठी आला होता का याची विचारपूस केली. त्यावेळी दुकानदार जरासंध बागल यांनी ओम हा चाॅकलेट घेऊन परत गेला असे सांगितले.

Murder
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : महाराष्ट्राची गाठ आता तमिळनाडूशी

मनोज बागल आणि त्यांच्या नातेवाईकांनी ओम याची शोधाशोध केली. ओम सापडला नसल्याने तुळजापूर पोलीसांत मनोज बागल यांनी अज्ञात लोकाविरूद्ध अपहरणाची फिर्याद शुक्रवारी ता.17 मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दाखल केली. यासंदर्भात तुळजापूर पोलीसांनी शुक्रवारी सकाळपासूनच तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाटगे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह पथकाने तपास केल्यानंतर सदर ओम याचा मृतदेह शेजारच्याच घरात असल्याचे लक्षात आले.

ओम यांस चापट मारून नायलाॅनच्या दोरीने गळा आवळला असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात पोलीसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील यासह पोलीसांनी संशयित तपासाची चक्रे फिरवण्यास सुरवात केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गतीने चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com