तूळजापूर : अंदाज चुकला अन् ट्रक नदीत कोसळला; दोघांचा बुडून मृत्यू     

केशव गायकवाड
Friday, 14 August 2020

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील घटना

इटकळ (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलावरून ट्रक नदीत कोसळल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चालक व क्लिनरचा अपघातात मृत्यू झाला असून गुरुवारी (ता.१३) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

सोलापूर येथील एक ट्रक हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमध्ये सुमारे २५ टन साखर भरलेली होती. हैद्राबादकडे निघालेला ट्रक (एमएच १३ सी.व्ही.एल ५५४७) हा राष्ट्रीय महामार्गावर बाभळगाव तलावाच्या जवळ आला. त्याच ठिकाणी एक कार्नर आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने तलावाचे पाणी आहे. मात्र चालकाला अंदाज आला नसल्याने ट्रक पाण्यात पलटी झाला.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

यामध्ये सर्फराज इन्युस शेख (वय२४) व महादेव भिसापती रासकोंडा (वय ४०- रा. विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडल्याने अंधारात इटकळ व नळदुर्ग येथील पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या दोघांचा मृतदेह बाहेर काढला.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

रात्री दहाच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोटे व मस्के यांनी इटकळ दूरक्षेत्राचे जमादार व्ही. आर. जाधव, पोलीस एल. बी. शिंदे, मनमत पवार यांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला. याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. १४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार व्ही. आर. जाधव हे करीत आहेत.

Edit- Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuljapur track accident news two death