esakal | रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या का, आता बसा बोंबलत

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

शहरात येणारे भाविक नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर कुठेही आणि कशाही गाड्या लावतात. या भाविकांच्या वाहनाचे फोटो काढून ऑनलाइन दंड करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. शहरात रस्त्यावर बेदरकारपणे वाहन उभी करणाऱ्या वाहनचालकांना यामुळे आळा बसणार आहे. 

रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या का, आता बसा बोंबलत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : शहरात येणारे भाविक नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर कुठेही आणि कशाही गाड्या लावतात. या भाविकांच्या वाहनाचे फोटो काढून ऑनलाइन दंड करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. शहरात रस्त्यावर बेदरकारपणे वाहन उभी करणाऱ्या वाहनचालकांना यामुळे आळा बसणार आहे. 

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दररोज येतात. बहुतांश भाविक खासगी वाहनांतून येतात. भाविकांची ही वाहने शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावरच उभी केली जातात. भाविकांची वाहने रस्त्यावर उभी केली जाऊ नयेत, यासाठी पोलिस आणि नगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांना हरताळ लागलेला आहे.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

शहरात रस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रकार सध्याही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक ऑटोरिक्षा, चारचाकी वाहनांना यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यातून वाहतुकीच्या कोंडीची समस्या वारंवार घडत आहेत. त्यामुळे यावर पर्याय म्हणून पोलिसांनी आता रस्त्यावर उभा केलेल्या वाहनाचे फोटो काढून अशा वाहनावर ऑनलाइन दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

किमान पाचशे ते हजार रूपयांपर्यंत संबधित वाहनमालाकाला दंड भरावा लागणार आहे. रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाचा पोलिस कर्मचारी फोटो काढतात आणि कायदेशीर कारवाई सुरू करतात. शहरात पूर्णतः बंद झालेली वाहने रस्त्यावर येण्यास सुरवात झाली आहे.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

पोलिस खात्याने आता नवीन कारवाईचा बडगा उगारल्याने त्याचे भवितव्यात काय परिणाम होतात हेही महत्त्वाचे आहे. तुळजापूर शहरात भाविकांची वाहने काही भागात रस्त्यावर उभी केली जातात. त्याचा परिणाम शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.