परीक्षा केंद्रांवर राहणार करडी नजर, मंगळवारपासून बारावीची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

लातूर : विद्यार्थी जीवनात महत्त्वाची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता.18) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी लातूर विभागीय मंडळातील 91 हजार 584 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथील 207 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून येथील तयारी पूर्ण झाली आहे. गैरप्रकार घडू नये म्हणून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच प्रत्येक केंद्रावर कडक नजर ठेवली जाणार आहे.

परीक्षेदरम्यान कुठलेही गैरप्रकार घडू नये म्हणून वेगवेगळ्या पथकांची परीक्षा केंद्रावर करडी नजर असणार आहे. जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि निरंतर शिक्षण विभाग यांची तीन पथके, महिला पथक, उपशिक्षणाधिकारी पथक, जिल्हा शिक्षण संस्थेचे पथक, जिल्हाधिकऱ्यांच्या नियंत्रणाखालील दक्षता समिती आणि बैठे पथक अशी वेगवेगळे पथके गैरप्रकारांवर लक्ष ठेऊन असणार आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय यादगिरे यांनी दिली.लातूरमधील 290 कनिष्ठ महाविद्यालयातील 36,445 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात विज्ञान शाखेच्या 15 हजार 709, कला शाखेच्या 12 हजार 279, वाणिज्य शाखेच्या 5 हजार 598, व्होकेशनलच्या 2 हजार 859 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Video: अबब...! मोबाईल ‘रेंज’साठी झाडावर स्वारी

नांदेडमधील 261 कनिष्ठ महाविद्यालयातील 38 हजार 721 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात विज्ञान शाखेच्या 15 हजार 893, कला शाखेच्या 17 हजार 687, वाणिज्य शाखेच्या 4 हजार 120, व्होकेशनलच्या 1 हजार 021 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उस्मानाबादमधील 141 कनिष्ठ महाविद्यालयातील 16,418 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात विज्ञान शाखेच्या 6 हजार 617, कला शाखेच्या 6 हजार 564, वाणिज्य शाखेच्या 2 हजार 104, व्होकेशनलच्या 1 हजार 133 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.---जिल्हा : विद्यार्थी संख्या : परीक्षा केंद्र लातूर : 36,445 : 86नांदेड : 38,721 : 82उस्मानाबाद : 16,418 : 39एकूण : 91,584 : 207

हेही वाचा - Shiv Jayanti : ‘या’ शहरात शिवजयंतीनिमित्त वाहतुक मार्गात बदल...कसा तो वाचा

बारावीची परीक्षा महत्त्वाची समजली जाते. त्यामुळे बरेच विद्यार्थी दडपणाखाली असतात. काहींना ताणतणावाला सामोरे जावे लागते; पण विद्यार्थ्यांनी परीक्षेचे कसलेही दडपण घेऊ नये. आनंदी मनाने परीक्षेला सामोरे जावे.
- संजय यादगिरे, अध्यक्ष, लातूर विभागीय मंडळ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelfth Class Board Exam Starts From Tuesday