
Hingoli : सोलापूरला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात, १२ प्रवासी जखमी
वारंगा फाटा (जि.हिंगोली) : रायपूर ते सोलापूर प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पलटी झाल्यामुळे सोमवार (ता.तीन) सकाळी पाच वाजता अपघात झाला. यात बारा प्रवासी जखमी झाले. यापैकी एक गंभीर जखमी आहे. या सर्वांना नांदेड (Nanded) येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, रायपुर (छत्तीसगड) येथून सोलापूर येथे जाणारी खासगी बस (सीजी ०८ एएल ६०२५) प्रवासी मजूर घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्ग वारंगा फाटा (Hingoli) येथे सकाळी पाच वाजताच्या दरम्यान भवानी मंदिरालगत खासगी बस पलटी झाल्यामुळे अपघात झाला.(Twelve Passengers Injured In Travel Bus Accident In Hingoli)
हेही वाचा: धक्कादायक! मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात तब्बल 50 सापांचा मृत्यू
या बसमध्ये ८० प्रवासी प्रवास करत होते. यातील बारा प्रवासी जखमी झाले असुन एक गंभीर झाला. अपघाताची माहिती मिळताच बीट जमादार शेख बाबर, राजेश मुलगीर, होमगार्ड तसलीम प्यारेवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेमध्ये शासकीय रुग्णालयात, नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
Web Title: Twelve Passengers Injured In Travel Bus Accident In Hingoli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..