esakal | चोवीस विद्यार्थ्यांसह, मजूर उदगीरहून बसने नागपूरला रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. यात अडकून पडलेल्या विद्यार्थी व मजुरांची मोठी कोंडी झाली. नागपूर परिसरातील अशा अडकून पडलेल्या २४ विद्यार्थी व मजुरांना सोमवारी (ता. ११) अप्‍पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या उपस्थितीत एसटी बसने नागपूरला रवाना केले.

चोवीस विद्यार्थ्यांसह, मजूर उदगीरहून बसने नागपूरला रवाना

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. यात अडकून पडलेल्या विद्यार्थी व मजुरांची मोठी कोंडी झाली. नागपूर परिसरातील अशा अडकून पडलेल्या २४ विद्यार्थी व मजुरांना सोमवारी (ता. ११) अप्‍पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या उपस्थितीत एसटी बसने नागपूरला रवाना केले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यावेळी उदगीर आगारप्रमुख यशवंत कानतोडे नायब तहसीलदार राजाभाऊ खरात रोटी कपडा मकान बँकेचे गौस शेख खुर्शीद आलम लक्ष्मण जाधव आदी यावेळी उपस्थित होते. येथील मध्यवर्ती बसस्थानकात चोवीस प्रवासी असलेली बस नागपूर कडे मान्यवरांच्या उपस्थितीने रवाना करण्यात आली.
यात १३ विद्यार्थी तर ११ मजुरांचा समावेश होता. १३ विद्यार्थी हे येथील स्वामी विवेकानंद कॅम्पस मधील असून ते टाळेबंदीमुळे कॅम्पस मध्येच अडकून पडले होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांची आत्तापर्यंत सर्व सोय केली आहे. यातील अकरा मजूर हे रोटी कपडा मकान बँकेच्या शहरी बेघर निवारा केंद्रात राहत होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

राज्य शासनाने अडकलेल्या विद्यार्थी मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची सोय करून त्यांना बस उपलब्ध करून दिली आहे याचे आदेश येताच या नागरिकांनी प्रमुखांची संपर्क साधला व नोंदणी केली एका बसमध्ये एका सीटवर एकाच व्यक्तीला बसण्यास परवानगी आहे त्यामुळे २४ संख्या नागपूरची पूर्ण झाल्यानंतर पहिली बस अप्पर जिल्हाधिकारी श्री पाठक व नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री राठोड यांच्या उपस्थित नागपूरकडे सोमवारी दुपारी बारा वाजता रवाना करण्यात आली.

शहरातील बसस्थानकामध्ये शहरात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी व नागरिकांसाठी नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे नोंदणी केल्यानंतर व एका बसची संख्या पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना दूरध्वनीवरून बोलावून त्यांना त्या त्या शहराकडे रवाना करण्यात येत असल्याची माहिती नोंदणी प्रमुख सुरेश कज्जेवाड यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा