esakal | जळकोट तालूक्यात बावीस गाव अंधारात !
sakal

बोलून बातमी शोधा

000 jalkot.jpg

अथक प्रयत्नानंतर काही ठिकाणी बारा तासाने तर काही ठिकाणी अठरा तासाने वीज पुरवठा झाला सुरळीत. 

जळकोट तालूक्यात बावीस गाव अंधारात !

sakal_logo
By
विवेक पोतदार

जळकोट (लातूर) : वांजरवाडा (ता.जळकोट) येथील ३३ के.व्ही. उपकेंद्राअंतर्गत १३ गावात १७ तास तर परिसरातील १२ गावात बारा तास अशा एकुण २२ गावातील वीजपुरवठा सोमवारी (ता.१८) रात्रीपासून खंडित झाला होता. युद्धपातळीवर लाईनवर शोधमोहिमेनंतर मंगळवारी (ता.२०) दुपारनंतर या गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


सोमवारी रात्री आठच्या दरम्यान अचानक वांजरवाडा (ता.जळकोट) उपकेंद्रांतर्गत गावातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशीरापर्यंत उपविभागीय अभियंता शिवशंकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वाहिनीवर बिघाड शोधणे सुरु होते. परंतु यश आले नाही. मंगळवारी सकाळपासून पुन्हा युद्धपातळीवर शोधमोहिम सुरु झाली. उपविभागीय अभियंता शिवशंकर सावळे, कनिष्ठ अभियंता विजयकुमार शेरकर यांच्यासह सर्व लाईनमनची टीम मुख्य वाहिनीवर बिघाडाचा शोध घेत होती.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिरुर हडोळती मार्गावर हा फॉल्ट सापडला. त्याच्या दुरूस्तीनंतर पुरवठा सुरु केला. त्यामुळे काही गावात विजपुरवठा सकाळी दहा वाजता सुरु झाला. परंतु अचानक वांजरवाडा उपकेंद्राच्या रोहीत्रातील ऑईल कमी झाल्याची समस्या निर्माण झाल्याने त्याची दुरूस्ती करुन १३ गावात दुपारी दोन वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ढगाळ वातावरणाने उष्णता वाढली होती. पंखे बंद असल्याने नागरिक हैराण झाले. तर पिठाच्या गिरण्या, पिण्याच्या पाण्याचे बोअर बंद झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. परंतू महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी अथक परिश्रमानंतर पुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांनी नागरिकांच्या जीवात जीव आला. 


सोमवारी रात्री अचानक हा बिघाड झाला होता. रात्री उशीरापर्यंत विद्युत कर्मचार्यांच्या मदतीने बिघाड शॊधत होतो. पण यश येत नव्हते. शेवटी सकाळी हडोळतीजवळ मुख्य लाईनवर फॉल्ट सापडला. त्यानंतर त्यात दुरूस्ती करुन पुरवठा सुरळीत केला. पावसाळ्यात कधी कधी अचानक असे दोष निर्माण होतात. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे -

शिवशंकर सावळे (उपविभागीय अभियंता)

(संपादन-प्रताप अवचार)