'डोळ्यादेखत पोटची लेकरं बुडाली, फोन करावं तर नेटवर्क काम करेना'

या दुर्दैवी घटनांमुळे त्याचा शाळेतील बालपणाचे आनंद घेण्याअगोदरच जगाचा निरोप घ्यावा लागल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे
kej
kejkej

केज (बीड): तालुक्यातील लाडेवडगाव शिवारातील शेतातील शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार (ता.२७) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सलग दोन दिवसातील घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील लाडेवडगाव शिवारातील रोकडपट्टी नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात माधव नामदेव लाड यांच्यासोबत त्यांची दोन मुले हर्षद माधव लाड (०७ वर्ष) व उमेद माधव लाड (०५ वर्ष) हे गेले होते. माधव लाड शेतातील जनावरे चरत शेजाऱ्याच्या शेतात गेल्याने ते आणण्यासाठी गेले असता त्यांची दोन्ही मुले त्यांच्या मागे जात असताना पाण्याने भरलेल्या शेततळ्यात पडली. वडीलांना पोहता येत नसल्याने मुले तळ्यात पडल्याचे पाहून मदतीसाठी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैव असे की, याच सुमारास फोनचे नेटवर्क नव्हते. तोपर्यंत उशीर झाल्याने दोन्ही सख्खा भावांचा बुडून मृत्यू झाला होता.

गावात जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. यातील मोठ्या हर्षदचे कालच शाळेत पहिलीला नाव घातले होते. मात्र या दुर्दैवी घटनांमुळे त्याचा शाळेतील बालपणाचे आनंद घेण्याअगोदरच जगाचा निरोप घ्यावा लागल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

kej
प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत विधवेला बेदम मारहाण

तालुक्यातील शेलगाव गांजी येथील दुसऱ्या घटनेत सोमवार (ता.२६) रोजी आकांक्षा रेवनसिद्ध पटणे (वय-११) या मुलीचा श्रीमंत पटणे यांच्या शेतातील तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com