पिंपळगावच्या दोघांना गावकर्‍यांनी रोखले, अहवालात आले पाॅझिटिव्ह...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

वाशी तालुक्यात पहिलाच कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना त्या रुग्णांच्या संपर्कातील दोघांनाही संसर्ग झालेला आहे, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

उस्मानाबाद : पिंपळगाव (लिंगी, ता. वाशी) येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी रात्री येथील एका सहावर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आलेला होता. या मुलीच्या अत्यंत जवळच्या संपर्कातील हे लोक असून मुंबई येथून या कुटुंबीयांसोबत तीन दिवसापूर्वी तालुक्यात आलेले आहेत.

वाशी तालुक्यात पहिलाच कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना त्या रुग्णांच्या संपर्कातील दोघांनाही संसर्ग झालेला आहे, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. 
मागील तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव (लिंगी) (ता.वाशी) येथील एक कुटुंब जोगेश्वरी वेस्ट (मुंबई ) येथून खाजगी वाहनाने गावी परतले होते. गावी परतत असताना नगर येथे पोहचल्यानतंर पिंपळगाव (लिंगी ) येथे संपर्क करुन गावी येत असल्याची माहिती दिली. मात्र गावातील नागरिकांनी गावात येऊ नका असे सांगितले. यानतंर हे सर्वजण वाशी येथे आले. यावेळी या कुटुंबातील सहा जण व खाजगी वाहनांचा चालक अशा सात जणांची  शहरातील कोरोना केअर सेंटर येथे तपासणी करून सर्वाना क्वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी (ता.२० ) सातही जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

सातपैकी पाच जणांचे अहवाल गुरवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. यातील एक सहावर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तिघांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. दोन अहवाल प्रलंबित होते, ते दोन्ही आता पाॅझिटिव्ह आले आहेत. या कुटुंबाला गावात नागरिकांनी प्रवेश नाकारला होता. त्यामुळे  हे कुटुंब पिंपळगाव (लिंगी ) ता.वाशी येथे आले नसल्याने गावातील कोणाचाही या कुटुंबाशी संपर्क आला नसल्याचे ग्रामसेवक बी. एच. हांगे यांनी सांगितले आहे. या दोन रुग्णामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता २५ वर पोहचली असून त्यातील चार जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. सध्या २१ लोकांवर उपचार सुरू असून त्यातील एक जण सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
  
रुग्ण संख्या २३ वर
जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या २३ वर पोचली आहे, त्यातील चार जणांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आरोग्य प्रशासनाला यश मिळाले. अजूनही 19 रुग्ण उपचार घेत असून, त्यातील एकाला सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये आजवर सापडलेल्या रुग्णांकडून संपर्कातील लोकांना संसर्ग झाला नसल्याचे दिसून आले होते. मात्र, गुरुवारी आलेल्या अहवालात रुग्णांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने आता काळजी घेण्याची गरज आहे. मुंबई, पुणे व अन्य हायरिस्क भागातून आलेल्या लोकांची संख्या जिल्ह्यामध्ये मोठी आहे, साहजिकच त्या ठिकाणी प्रशासनाकडून व आलेल्या नागरिकांकडून अधिक दक्षता घेण्याची  अपेक्षा आहे. बऱ्याचदा क्वारंटाइन केल्यानंतरही लोक बाहेर फिरताना
दिसत असल्याने त्याचा धोका किती मोठा होऊ शकतो याचा अंदाज करणे अवघड आहे. 

नेमके काय झाले?
रिक्षा चालक असलेला जेवळी येथील ३० वर्षीय युवक गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथील कांदिवली परिसरात कुटुंबासह राहतो. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्याने तो शुक्रवारी (ता. १५) रात्री आठ वाजता आपल्या मूळगावी जेवळी येथे दोन ऑटोरिक्षांमधून कुटुंबातील आकरा जणांसह आला. त्या सर्वांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून ग्रामपंचायत प्रशासनाने येथील बसवेश्वर विद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले होते.

या युवकाला काही प्रमाणात ताप व सर्दीचा त्रास सुरू झाल्याने त्या रुग्णाचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविले होते. बुधवारी (ता. २०) पहाटे दीड वाजता या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य प्रशासनासह पोलिस गावात पहाटेच दाखल होत संबंधित या रुग्णाच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या पंधरा व्यक्तींना ताब्यात घेऊन विलगीकरणाबरोबरच उपचार करून त्यांचे स्वॅब घेण्यासाठी लोहारा येथे पाठविण्यात आले होते.

क्रिकेटपूर्वी सचिनने केलेय या चित्रपटात काम

गुरुवारी (ता. २१) रात्री साडेअकरा वाजता त्या रुग्णाच्या कुटुंबातील पाठवलेल्या पंधरा स्वॅब नमुन्यांपैकी पत्नी, भाचा, मेव्हणा व १४ वर्षांची भाची अशी चार जणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याच कुटुंबातील पाठवलेले दोघांचे अहवाल हे संदिग्ध आल्याने आज या दोघांचे स्वॅब नमुने पुन्हा पाठविले जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कठारे यांनी आता येथे रुग्णांची एकूण संख्या पाच झाली आहे. 
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two corona patients at Pimpalgaon dist Osmanabad