केदारखेडा - भोकरदन-जालना महामार्गावरील बाणेगाव फाट्यानजीक मोटार सायकलस्वार क्र. एम.एच.21बी डब्लू 8332 वरून जाणा-या विकी जाधव तसेच भुषण लोखंडे यांना मानव विकासची बस क्र.एंम.एच.06s8700 ही केदारखेड्याहुन मुलींना घेऊन जाते वेळी हा अपघात झाला..जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जागेवरच गतप्राण झाले. या दोघांना तपासणीसाठी ऍम्ब्युलन्स सुमारे तीस मिनिटानंतर दाखल झाली. त्यानंतर त्यांना घेऊन जाण्यात आले. ही घटना शुक्रवारी (ता. 25) दुपारी सव्वाचारच्या सुमारास भोकरदन-जालना रस्त्यावर बाणेगाव फाट्याजवळ (ता. भोकरदन) जवळ घडली..यासंबंधी अधिक माहिती अशी, विकी जाधव व भुषण लोखंडे हे दोघेजण भोकरदनहुन जालन्याकडे जात होते. सकाळपासुन पावसाची रिपरिरप चालु होती. परंतु जोराचा पाऊस सुरू झाल्यामुळे याठिकाणी प्रत्यक्ष दर्शींना काहीही न दिसल्याने हा अपघात कसा झाला, हे मात्र कळु शकले नाही. मात्र या दुचाकीस्वारांचे मेंदु तसेच मांसाचे तुकडे हे रोडवर दिसुन आले..बसमध्ये असणा-या शाळेतील मुली खुप भयभीत झाल्या. या बसचा चालक अपघात ठिकाणावरूण निघुन गेल्याने हा अपघात कसा झाला हे कळले नाही. यातील मुलींच्या शाळेत संपर्क केला. व तेथील काही शिक्षकांनी भरपावसातच मुलींना घरापर्यंत सोडल्याचे दिसुन आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.